छत्रपती संभाजीनगर येथे नशेच्या गोळ्या व बटण विकणाऱ्यास आरोपीला ताब्यात सिटीचौक पोलिस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत                   

सिटीचौक हद्दीत 370 नशेच्या गोळ्या (बटण) अवैध रित्या विकणा-या आरोपीच्या सिटीचोक पोलीसांनी आवळल्या मुसक्या.
दिनांक. 01/02/2024 रोजी आम्हास गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शेख मजीद शेख गफुर वय-20 वर्षे व्यवसाय- रीक्षा चालक रा. गल्ली नं. 20, असद किराणाच्या बाजुला, सादत नगर, रेल्वे स्टेशन, छत्रपती संभाजीनगर हा सिटीचौक येथील बारुदगरनाला येथे नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्री लायक माहीती सिटी चौक पोलिस ठाण्यात मिळाली. मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता व बातमीची शहानिशा करण्याकरिता बातमीदाराने सांगितलेल्या ठिकाणी स्टाफ व शासकीय पंच, वैज्ञानिक तज्ञ असे जावुन त्या ठिकाणी सापळा रचुन बातमीदाराने दिलेल्या वर्णनाचा एक इसम NITROSUN 10 (बटण) गोळ्यांची विक्री करीत असतांना दिसुन आला सदर इसमास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख मजीद शेख गफुर वय-20 वर्षे व्यवसाय- रीक्षा चालक रा. गल्ली नं. 20, असद किराणाच्या बाजुला, सादत नगर, रेल्वे स्टेशन, छत्रपती संभाजीनगर असे सांगितले.सदर इसमाच्या ताब्यातुन 30,000/- रु बाजार मुल्याच्या NITROSUN 10 (NITRAZEPAM TABLETS IP 10 MG) असे इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरात नाव असलेल्या 370 गोळ्यांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सिटीचौक येथे गुर.नं. 41 /2024 कलम 22 (ब) गुंगीकारक औषधीद्रव्ये आणी मनावर परिनाम करणारे पदार्थ (NDPS Act) अधिनीयम 1985 सह कलम 328, 276 भा.द.वी. सह कलम 18 (A), 18 (C), (II) औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनीयम 1940 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही मा. आयुक्त डॉ. मनोज लोहीया, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01 श्री नितीन बगाटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग, श्री. संपत शिंदे, यांच्या मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक, निर्मला परदेशी पोउपनि प्रशांत मुंडे, पोउपनि कदम, पोह/मुनीर पठाण, पोअं/ इप्पर, पोअं/ त्रीभुवन, पोअं/टेकले, पोअं / सोहेल पठाण, पोअं/ बाव्हुळ सर्व नेमणुक पोलीस स्टेशन सिटीचौक छत्रपती संभाजीनगर व औषधी निरीक्षक श्री ब.दा. मरेवाड यांनी केली. सदर गुन्हयांचा तपास पोउपनि श्री प्रशांत मुंडे हे करित आहेत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *