प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: नंदुरबार येथील खोडाई माता परिसरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी तीन राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात .
या मुळे गर्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व भाविकांच्या अडचणी सोडविण्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा परिसरात पोलीस चौकी चे उद्घाटन करण्यात आले . पोलीस चौकीच्या उदघाटनाचा मान पोलीस अमंलदार सविता तडवी यांना देत पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नारी शक्तीचा सन्मान केला .
या मुळे त्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कौतुक केले आहे .
नंदुरबार येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खोडाई माता परिसरात कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेख़ोडाई माता नवसाला पावणारे देवस्थान असल्याने येथे महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील भाविकदेखील दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात . तसेच दोन वर्षां पर्यंत कोरोना निर्बंध असल्याने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते .
यामुळे यंदा मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये , भाविकांच्या अडीअडचणी सोडविण्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी यात्रोत्सव परिसरात पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.पोलीस चौकीच्या उद्घाटनाचा मान पोलीस अमंलदार सविता तडवी यांना देण्यात आला .
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या या कृतीचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कौतुक केले आहे . सोशल मिडीयाच्या व्टिटरवर रुपाली चाकणकर यांनी टाकलेल्या पोस्ट मध्ये नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा उत्सव.स्त्रीत्वाचा सन्मान सोहळा .
नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी यात्रोत्सवातील पोलीस चौकीचे उद्घाटन महिला पोलीस अमंलदार सविता तडवी यांच्या हस्ते करुन नारी शक्तीचा सन्मान केला आहे . स्त्री – पुरुष असा भेद न करता अहोरात्र बंदोबस्तात असणाऱ्या सहकाऱ्यांचाही हा सन्मान आहे . कृतीतून महिलांप्रती आदर , सन्मान व्यक्त करणाऱ्या पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे कौतुक केले आहे .
Users Today : 22