बुलडाणा, दि. 14 : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यासाठी नवीन संस्था आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाइी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन संस्थांनी मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम किंवा तुकडी सुरु करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक संस्थांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, गणेशनगर, एचपी गॅस गोडाऊन समोर, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
मंडळाद्वारे मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांची यादी, सविस्तर अभ्यासक्रम, अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य, अभ्यासक्रमांची समकक्षता, संबंधित शासन निर्णय, माहिती पुस्तिका, अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म लिंक आदी सर्व माहिती मंडळाच्या msbsvet.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, व्ही. बी. बचाटे यांनी केले आहे.
Users Today : 16