कवठे येमाई दि. १४ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण हद्दीतील खाजगी शिक्षण संस्था बाबत सातत्याने पालकांकडून येणाऱ्या तक्रारी, शाळा पालक यांच्यातील विसंवाद यावर एकत्रित चर्चा करण्यासाठी नुकतीच शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत यांनी हद्दीतील शिक्षण संस्था व पालक यांच्यातील समस्या बाबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अतिशय महत्वाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. शाळांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ निर्णय घेण्याचे मान्य केले. तर यास शाळांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती या बैठकीस उपस्थित असलेले शिरूर ग्रामीणचे माजी आदर्श सरपंच अरुणराव घावटे यांनी दिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष संजय पाचंगे हे आवर्जून उपस्थित होते.
शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीने हा अतिशय सुत्य उपक्रम सुरु केला असुन यामुळे पालक, शाळा यांच्यातील वादविवाद कमी होण्यास मदत तर होईलच पण चांगले शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या रहाण्यास बळकटी येईल. महाराष्ट्रातील बहुतेक अशा प्रकारची बैठक आयोजित करणारी शिरुर ग्रामीण ही पहीलीच ग्रामपंचायत असावी.
या बैठकीस शिरूर ग्रामीणचे माजी आदर्श सरपंच अरुणराव घावटे,शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच बाबाजी वर्पे,शिरूर मार्केट कमिटीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, ग्रामपंचायतीचे कायदेशीर सल्लागार ऍड.शिवशंकर हिलाळ ,जेष्ठ पत्रकार नितीन बारवकर,माजी सरपंच विठ्ठल घावटे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच संजय शिंदे,अनेक ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक,१२ खाजगी शिक्षण संस्थांचे चालक,प्रतिनिधी पालक आवर्जून उपस्थित होते.प्रारंभी खाजगी शिक्षण संस्थांच्या अडचणी,समस्या समजून घेण्यात आल्या.परिसरातील विद्यार्थ्याना योग्य त्या शुल्कात प्राधान्याने प्रवेश द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.पालकांना जाणवणाऱ्या अडचणीवर देखील चर्चा करण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठक शांततेत पार पडली.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६,९४२३०८३३७६
Users Today : 16