‘निश्चय पूर्तीचा महामेरू’ महानाट्यास उस्फूर्त प्रतिसाद खामगाव येथे महासंस्कृती महोत्सव

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा, दि. १३ : खामगाव येथील महासंस्कृती महोत्सवात आज दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘निश्चय पूर्तीचा महामेरु’ महानाट्य सादर करण्यात आले. आहे. या महानाट्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महानाट्याच्या सुरुवातीला आयोजित कार्यक्रमात महानाट्य आयोजनासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी आमदार ॲड. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे आदी उपस्थित होते.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील क्रीडा संकुलात महासंस्कृती महोत्सवास सुरुवात झाली आहे. या महोत्सवास खामगाव येथे चांगला प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात पारंपरिक कला प्रकारही स्थानिक कलाकारांकडून सुरुवातीला सादर करण्यात आले. या महोत्सवातील महानाट्यास नागरिकांना प्रवेश विनामुल्य आहे.

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *