प्रतिनिधी:- फैजल पठाण शिरूर तालुका युवक काँग्रेस आक्रमक…..! महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे सरकार सत्तेवर आले. व गृहमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणीस यांच्याकडे असताना कधी पोलीस ठाण्यामध्ये तर कधी पार्टी कार्यालयामध्ये गोळीबार करून महाराष्ट्रात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर कधी पत्रकारांवर ,सामाजिक कार्यकर्त्यावर तसेच एडवोकेट यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे. कायदा व सुव्यवस्था याची जबाबदारी संभाळता येत नसेल तर निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली.
येणाऱ्या निवडणुकीमधून ईव्हीएम ला हद्दपार करा, आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, युवकांना रोजगार द्या, पत्रकारांवरील हल्ले थांबवा अशा अनेक प्रश्नासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व शिरूर तालुका युवक काँग्रेस तसेच शहर युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक सचिव चंद्रशेखर जाधव, मावळ विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश वाघोले, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतीक जगताप, शिरूर तालुका अध्यक्ष वैभव यादव, शिरूर तालुका युवक अध्यक्ष संकेत गवारी, शिरूर शहर युवक अध्यक्ष अमजद पठाण, शिरूर शहर अध्यक्ष किरण आंबेकर, शिरूर तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष अजिम सय्यद, शिरूर तालुका युवती अध्यक्ष सुचिता अडसूळ, शिरूर तालुका उपाध्यक्ष डॉक्टर सुजित शेलार , कल्पना पुंडे, भरत अडसूळ , प्रदीप गुप्ता, विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रदीप मेहकरे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, कैकाडी समाजाचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, ओबीसी तालुका अध्यक्ष अमोल घुमे, भटक्या विमुक्त तालुकाध्यक्ष दिलीप गव्हाणे, सोशल मीडिया सेलचे तालुका अध्यक्ष निरपेक्ष पाठक , नासिर शेख इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.
Users Today : 16