दिनांक:-15-2-2023
प्रतिनिधी:-शिवाजी उदार
मेरा खुर्द:-चिखली ते देऊळगाव राजा रोडवर अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी ते अंढेरा फाट्याच्या मध्यभागी असलेल्या घाटात रात्रीच्या वेळेस जालना येथील राजुरी स्टील चे मालक मुनीमजी व ड्रायव्हर हे दोघेजण चिखलीकडून देळगाव राजाकडे जात असताना,या घाटात अज्ञात दरोडेखोरांनी दोन गाड्या त्यांच्या गाडीला आडव्या लावून गाडी थांबवली.व त्यांना गाडीच्या बाहेर रस्त्याचा बाजूला नेऊन राजुरी स्टीलचे मालक व त्यांच्या ड्रायव्हर या दोघांवर दरोडेखोरांनी हल्ला करून,त्यांच्याजवळ असलेली रोक रक्कम व ऐवज लंपास करून हे दरोडेखोर फरार झाले आहेत.पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे.
Users Today : 13