गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा: मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी बुधवार तारीख 14 रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट दिली यावेळी सभापती उपसभापती व संचालकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती तथा जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे, संचालक संतोष वरकड, ॲड. पंकज बोराडे, शहर प्रमुख तथा संचालक वैजनाथ बोराडे, शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार, तुळशीराम कोहिरे, पप्पू दायमा, मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाविषयी बाजार समितीच्या सभागृहात चर्चा झाली. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमाचे तहसीलदार श्रीमती जोंधळे यांनी कौतुक केले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासह तळणी उपबाजार पेठ मध्ये शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा देणार असल्याचे यावेळी सभापती ए जे बोराडे म्हणाले. बाजार समितीला प्रशासन योग्य ते सहकार्य करील अशी ग्वाही यावेळी श्रीमती जोंधळे यांनी दिली
Users Today : 1