पर्यटण ..
दिवसेंदिवस वाढते
पर्यटणाची आवड
नवनवीन स्थळांची
चोखंदळांची निवड
धकाधकीचे जीवन
तरीही काढी सवड
विरंगुळा मनासाठी
जराशी सैल जखड
निसर्गाची जुळेनाते
बोलायां लागे दगड
आवडे जंगले समुद्र
पर्वत किल्ले न् गड
नदीसरोवर राफ्टिंग
करी ट्रेकिंग अवघड
निसर्गमानव निर्मित
रसिका जागा रग्गड
काही अति उत्साही
करी विचीत्र हुल्लड
विध्वंसक वृत्ती नाचे
निसर्गाची हो परवड
रोजगार निर्मितीची
नवीन कवाडे उघड
प्रशासन प्रयत्नशील
फळा ये रसाळ घड
भितो कोण शिक्षेला
मुळी जाईना अकड
सुधारणा वाव नाही
मस्तक असे भाकड
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 1