चिखली स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे वसंत पंचमी हा उत्सव जल्लोष यामध्ये साजरा करण्यात आला या उत्सवाच्या निमित्ताने वर्गाची सजावट करण्यात आली वर्गांमधील महापुरुष आणि माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून वही पुस्तक याचेही पूजन शिक्षक व विद्यार्थ्यांकडून करण्यात आले व विद्याभारती द्वारा राबविण्यात येणाऱ्या एकल विद्यालयासाठी समर्पण सुद्धा जमा करण्यात आले विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री रामेश्वरजी कुटे यांनी विद्याभारती द्वारा चालवण्यात येणाऱ्या एकल विद्यालय हे अत्यंत दुर्गम भागामध्ये चालविले जातात दुर्गम भागामध्ये राहणारे आपले समाज बांधव जे शिक्षणापासून वंचित राहतात अशा समाज बांधवांपर्यंत विद्याभारतीचे कार्यकर्ते पोहोचून त्यांना शिक्षित करण्याचे काम करतात वसंत पंचमी या दिवशी अर्पण केलेले समर्पण हे विद्याभारती द्वारा चालविण्यात येणाऱ्या शाळांना अर्पण केले जात हे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तर विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री समाधानजी शेळके सर यांनी सुद्धा याप्रसंगी विद्यार्थ्यांना वसंत पंचमी या सणाचे महत्त्व स्पष्ट करून देताना उत्तर भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात असे सांगितले सदर कार्यक्रमाला विद्यालयाची उपप्राचार्य माननीय श्री सतीशजी गव्हले सर, पर्यवेक्षक श्री गणेशजी नालिंदे सर, श्री नंदकुमार जी पाटील सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी बंधू-भगिनी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते
Users Today : 1