गोरेवाडा झू च्या जवळ मिळाला कुजलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृत देह

नागपूर : पोलीस ठाणे कपिल नगर हद्दीत राहणारे मेहबूब खान छोटे खान यांच्याशी दोन दिवसापासून संपर्क होत नसल्याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी दिनांक 10/08/2023 रोजी पोलीस स्टेशन कपिल नगर येथे तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस ठाणे कपिल नगर येथे मिसिंग दाखल करण्यात आले होते. सदरप्रकरणी तपास चालू असताना पोलीस ठाणे वरूड जिल्हा अमरावती येथून माहिती मिळाली की त्यांच्याकडे दाखल अपहाराच्या गुन्ह्यातील आरोपींनी त्यांचा साथीदार नामे मेहबूब खान छोटे खान याचा उशीच्या साह्याने नाक व तोंड दाबून खून केला आहे व त्याचे प्रेत नवीन काटोल नाका चौक ते गोरेवाडा zoo या दरम्यान नाल्यात टाकून दिले आहे. यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक कुजलेल्या अवस्थेतील प्रेत मिळाले त्यावरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे दिनांक 20/08/2023 रोजी मर्ग क्र 59/2023 अन्वये दाखल करण्यात आला. सदर प्रेत मेहबूब खान छोटे खान याचेच आहे याची शहानिशा करण्याकरता त्यांच्या आईचे डीएनए सॅम्पल घेऊन प्रेताचे अवशेषासह सीए परीक्षना करिता पाठविण्यात आले होते.
दिनांक 13/02/2024 रोजी मृतकाचे नातेवाईक मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर श्री रवींद्र सिंगल यांना भेटून, मृतकाचे अवशेष अद्याप पर्यंत मिळाले नसल्याबाबत सांगितले. त्यावरून मा. पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र सिंगल यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून त्वरित कारवाई करून घेतली. दिनांक 15/02/2024 रोजी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर येथून डीएनए परीक्षण अहवाल व मृतकाचे अवशेष प्राप्त झाले. मृतकाचे अवशेष त्यांची पत्नी नामे गुलशन जहा मेहबूब खान यांचे स्वाधीन करण्यात आले.
Users Today : 32