02 पुरुष 01 महिला आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा तालुक्यातील
दिनांक 25/04/2024 रोजी 02.30 वाजता बसस्थानक परीसरातुन मुलगी नामे नेहा सुनिल शिंदे वय 05 वर्ष रा.बानेगाव ता.घनसावंगी जि.जालना हिला अज्ञात इसमांनी पळवुन नेले बाबत फिर्यादी नामे सुशिलाबाई आत्माराम शिंदे रा.बानेगाव ता. घनसावंगी जि. जालना यांच्या तक्रारीवरुन सदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब जालना यानी स्थानिक गुन्हे शाखा जालना येथे वर्ग केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मागिल आठ दिवसापासुन गुन्हा उघडकीस आणणे कामी अहोरात्र प्रयत्न केले व जालना, परभणी, नांदेड, बीड, पुणे येथे जाऊन तांत्रिक विश्लेषण, माहितगार यांचे कडुन माहिती संकलित करुन गुन्हा हा क्लीष्ट स्वरुपाचा असल्याने बुध्दीकौशल्याचा वापर करुन अत्यंत शिताफिने गुन्हागारांचा शोध घेऊन अपहरीत मुलीची आरोपीच्या तावडीतुन सुटका केली. ताब्यात घेतलेल्या आरोपीना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांची नावे 1) महादेव एकनाथ सकाडे वय 37 वर्ष रा. घोडका राजुरी ता.जि.बीड, 2) सौ.शोभा महादेव सकाडे वय 35 वर्ष रा.घोडका राजुरी ता.जि.बीड, 3) राजेंद्र महादेव सकाडे वय 21 वर्ष रा.घोडका राजुरी ता.जि.बीड, अशी सागितले. त्यानंतर आरोपींना मुलीला पळवुन आणण्याचे कारण विचारले असता त्यांनी सदर मुलीस नारायणगाव ता. जुन्नर जि.पुणे येथे तमाशा फडा मध्ये विक्री करणार होते अशी कबुली दिली.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पहुरे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, सुधीर वाघमारे, दत्ता वाघुंडे, सतिष श्रीवास, योगेश सहाने, धिरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे, रमेश पैठणे महिला पोलीस अंमलदार चंद्रकला शडमल्लु, सर्व स्थानिक पोलीस, जालना यांनी कारवाई केली आहे.
Users Today : 15