संग्रामपूर तालुक्यातील मराठा समाजाचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
प्रतिनिधी वरवट बकाल(ज्ञानेश्वर पाटील दांदळे):
अमरावती येथील स्थानिक मंगलधाम संकुलात राहणारे विजय देशमुख यांच्या पत्नी कुंदाताई देशमुख आणि मुलगा सुरज देशमुख यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या देवानंद लोणारे व त्यांची पत्नी यांनी लोखंडी सलयीने वार करून दोघांचीही निर्दयपणे हत्या केली याशिवाय विजय देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना सुद्धा जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच विजय देशमुख यांचा मोठा मुलगा अंकुश देशमुख यालाही जिवे मारण्याची धमकी दिली तसेच संपूर्ण कुटुंब उध्वस्त करण्याची धमकी दिली.अशा परिस्थितीत देशमुख आई व मुलाची हत्या करणाऱ्या देवानंद लोणारे व त्यांच्या पत्नीला फाशी आणि जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अनेक ठिकाणावरून मराठा समाजाकडून करण्यात येत असून आज दिनांक 3 मे रोजी मराठा समाजाकडून संग्रामपूर प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण यांचे मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनातन नमूद आहे की देशमुख आई व मुलाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे केलेली हत्या ही पूर्ण नियोजित असून उपर्डी हत्याकांडातील घटनेची पुनरावृत्ती दर्शविणारी दिसते या घटनेचा समस्त मराठा समाज तीव्र निषेध करत आहे देशमुख आई व मुलाची अत्यंत क्रूर व सुनियोजित हत्या करणारे आरोपी देवानंद लोणारे व त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहकार्यावर अत्यंत कठोर गुन्हे दाखल करून ही केस जलद गतीने चालविण्यात यावी व या देशमुख मराठा कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी केलेल्या निवेदनावर विलासराव देशमुख, अनंतराव देशमुख,स्वप्निल देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, नंदू पाटील, चेतन बकाल, रवींद्र रावणकार, प्रणव देशमुख,चेतन देशमुख, शेख असलम, शेख कदिर यांच्या सह्या आहेत.
Users Today : 15