स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांची अपघात स्थळी धाव जिवीतहानी नाही
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
अजिंठा येथील घाटात राज्यातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या रावेर आगारची बसची दूरवस्था झाल्यावरुन नेहमीच टीका करण्यात येत असते. बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, कधी बसचं सीटच हलत असतं, तर खिडकीच्या काचा थडथड वाजत असतात, तर कधी पावसाळ्यात पत्र्यातून पाणीच बसमध्ये शिरते. मात्र, कधी कधी याच बसच्या दयनीस अवस्थेमुळे वाहक-चालकही खासगीत संताप व्यक्त करतात. त्यामुळे, काहीवेळा ह्या बस अपघाताचे कारणही ठरतात. तर, गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच अजिंठा घाटात पुणे ते रावेर जाणारी एसटी MH40-Y 5197 हि रोडच्या बाजूला जाऊन पलटी आहे.या बसचा भीषण अपघात झाला.त्यामधे ९ प्रवासी जखमी झाले आहे.अपघाताचे वृत्त कळताच फर्दापूर येथील सपोनि प्रफुल्ल साबळे व पूर्ण स्टाॅपसह घटनास्थळी जाऊन सदर ठिकाणी अॅम्बुलस बोलावून जखमींना हाॅस्टपिटला पाठवून देण्यात आले.व घाटातील वाहतूक सुरळीत करुन हा अपघात अजिंठा पोलिस ठाणे हद्दीत असल्याने वाहक व चालक यांना अजिंठा पोलिस स्टेशनमध्ये पाठविण्यात आले.बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमधून 66 प्रवासी प्रवास करत होते. तब्बल 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या या बसला अपघात झाला असून अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. पुणे ते रावेर प्रवास या मार्गावरुन ही बस धावत होती. मात्र, अजिंठा घाटात येताच, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मतदकार्य सुरू केले. अपघातामधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी अजिंठा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, काही जणांना खासगी रुग्णालयाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बस रस्त्यावरुन खाली घसरल्याने पलटी होवून बसचेही मोठे नुकसान झाले आहे.बसच्या पुढील व पाठीमागील बाजूच्या काचा फुटल्या असून टायरही निखळल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी आगार प्रमुखांना माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर, आगारीतल संबंधित अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते, त्यानुसार अधिकाही अपघातस्थळी पोहोचल्याचं दिसून आलं.जखमी झालेले प्रवासी पुढील प्रमाणे – सुशिलाबाई दिनकर निर्खे वय 70 राहणार जामनेर
दुखापत- 2)सरुबाई शामराव पाटील वय 65 राहणार श्रीरामपूर,3)वसंत विठ्ठल पठारे वय 65 वर्षे राहणार सोयगाव,4)निखिल किरण पाटील वय 13 वर्षे श्रीरामपूर,
5)सुमित्रा दिनकर निर्खे वय 48 वर्ष राहणार जामनेर,6)विजय हरी सूर्यवंशी वय 72 वर्ष राहणार जामनेर,7)संध्या वसंतराव पठारे वय 63 वर्ष राहणार सोयगाव ,8)जय मला विजय सूर्यवंशी वय 60 वर्ष राहणार जामनेर ,9)ज्योती साई चंद्र बासनेवल वर्ष 40 राहणार संभाजीनगर
Users Today : 20