पहूरला महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा ; ठिकठिकाणी ध्वजारोहण

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव
पहूर , जामनेर ( ता . १)येथे विविध शाळा , महाविद्यालय , शासकीय संस्थांमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . त्या निमित्त ध्वजारोहण करण्यात आले .
     *पहूर पोलीस ठाणे -*
पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते , पोलीस उपनिरीक्षक भरत दाते  यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते .
 *ग्रामपंचायत पहूर कसबे* –
प्रभाग क्रमांक ५ चे ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मतदार जनजागृती पोस्टर्सचे सरपंच आशा जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले . सुत्रसंचलन शंकर भामेरे यांनी केले .
 *गृप ग्रामपंचायत पहूर पेठ* –
माजी सैनिक प्रल्हाद तुकाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
 *आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय -*
मावळते मुख्याध्यापक एस . व्ही . पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
*सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय* –
डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
 *आर . बी . आर . विद्यालय -*
मुख्याध्यापक सुधिर महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . प्रयोगशाळा परिचर सुरेश यांनी ध्वजपूजन केले .
 *जिल्हापरिषद मराठी  शाळा -*
मुख्याध्यापक शिवाजी बुधवंत यांनी ध्वजारोहण केले तर सुत्रसंचलन राजेंद्र बोडखे यांनी केले .
 *लेलेनगर जिल्हा परिषद शाळा* –
मुख्याध्यापक चंद्रकांत साळूंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
 *ग्रामीण रुग्णालय पहूर* –
दंततज्ज्ञ डॉ . राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला .
0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *