ग्रामीण भागातील दक्षता समित्या ‘कागदावर’च ! गोकुळसिंग राजपूत यांची माहिती

Khozmaster
4 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात काही गावात  रेशन धान्य,  पुरवठा पारदर्शक व्हावा, सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय, ग्रामीण पातळीवर दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. तर काही गावात दहा वर्षे पासून दक्षता समितीची नेमणूक झाली नाही सावळदबारा येथे शुद्धा दहा वर्षे पासून दक्षता समिती स्थापन करण्यात आली नाही.परंतु केवळ मासिक बैठकीला हजेरी लावण्यापर्यंतच या समित्यांचे कार्य मर्यादीत झाल्याने अनेक समित्या केवळ ‘कागदा’वरच असल्याचे चित्र सोयगाव तालुक्यात पाहावयास मिळत असल्याची माहिती अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे मराठवाडा विभागिय सरचिटणीस गोकुळसिंग राजपूत,तालुका अध्यक्ष विजय काळे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप देशमुख, संदीप राजपुत,तालुका उपाध्यक्ष सुनील चोरमारे यांच्या निदर्शनास आल्याचे दिसून आले आहे.सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय, ग्रामीण पातळीवर दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या. परंतु केवळ मासिक बैठकीला हजेरी लावण्यापर्यंतच या समित्यांचे कार्य मर्यादीत झाल्याने अनेक समित्या केवळ ‘कागदा’वरच आहे तर काही गावात समिती स्थापन करण्यात आली नाही असल्याचे चित्र सोयगाव तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीवर अंकुश राहावा, वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी, ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा व्हावा यासाठी तालुकास्तरीय दक्षता समिती गठीत करण्यात येते. याप्रमाणेच गावपातळीवरही दक्षता समितीचे गठण केले जाते. सोयगाव तालुक्यात होणारा धान्य पुरवठा खरोखरच गोरगरीब जनतेपर्यंत पोहचतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी या समितीची आहे. परंतू, नियमित तपासणीच केली जात नाही. इ-पॉश मशीनवर वृध्द, गोरगरीब जनतेचे ठसे उमटत नाहीत, तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचे या लाभार्थीचे म्हणणे आहे. या तक्रारीकडेही समितीचे लक्ष नसल्याचे दिसून येते. काही गादक रोजगाराच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत त्यांच्या नावावर येणाऱ्या धान्याची उचल कशी होते आदी बाबींकडे स्थानिक दक्षता समितीने प्रत्यक्ष स्थानिक रेशन वितरकांकडे भेटी देणे आवश्यक आहे. शिवाय रेशन धान्य दुकानदाराने आपल्या दुकानाच्या दर्शनी भागास फलक लावणे आवश्यक आहे. दर फलक लावताना किती मालाची उचल झाली, किती माल शिल्लक आहे, त्या मालाचे शासकीय दर किती आहे व ग्राहकांना तो माल शासकीय दरात विकल्या जातो का, दुकानात तक्रारी नोंद वही ठेवण्यात आली आहे का आदी बाबींची पडताळणीही दक्षता समितीला करावी लागते.परंतु काही गावात दक्षता समितीच नाही.याकडे पुरवठा अधिकारी सोयगाव यांनी तातडीने लक्ष देऊन ज्या गावात दक्षता समिती नेमली नाही तेथे समिती स्थापन करण्यात यावी.अशी मागणी संघटनेच्या वतीने गोकुळसिग राजपूत यांनी केली आहे.सोयगाव तालुक्यातील अनेक रेशन दुकानांत दर्शनी भागात दरपत्रक लावले नाहीत. यावरून दक्षता समित्या केवळ मासीक बैठकीपुरत्या मर्यादीत उरल्याचा आरोप लाभार्थीमधून होत आहे. दक्षता समित्याची मासीक बैठक दर महिन्याला होत असते. परंतू, या बैठकीत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी फारशी होत नाही अशी ओरड ग्रामीण भागातुन होत आहे. ग्रामीण भागात स्थानिक रेशन दुकानदार, रेशन दुकान यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता समिती गठीत आहे. त्या समितीचे अध्यक्ष सरपंच असतात तर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व ग्रा.पं. सदस्य त्या समितीचे सदस्य आहेत. परंतु या समित्या केवळ कागदावरच पाहावयास मिळतात. ग्रामीण भागातील समित्यांना
आपल्या अधिकाराची जणू जाणीवच नाही, असा आरोप गोकुळसिंग राजपूत,तालुका अध्यक्ष विजय काळे  यांनी केला आहे.तालुका दक्षता समितीच्या बैठका नियमित होतात.बैठकी दरम्यान वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी.यासाठी विविध ठराव घेतले जातात.तरीशुद्धा कुठे ग्राहकांची अडवणूक होत असेल तर त्यांनी दक्षता समितीकडे तक्रारी कराव्यात परंतु सावळदबारासह काही गावात दक्षता समिती स्थापन नाही तर तक्रारी कोणाकडे करायाची अशा प्रश्न रेशनकार्ड धारकांना पडला आहे.याकडे सोयगाव पुरवठा अधिकारी लक्ष देतील का? अशा प्रश्न रेशनकार्ड धारकांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे पदाधिकारी गोकुळसिंग राजपूत, दिलीप देशमुख,विजय काळे, संदीप राजपुत, सुनील चोरमारे याच्याशी केला आहे.
0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *