महाविकास/इंडिया आघाडीची गणोरी व पाल येथे डॉ कल्याण काळे यांची प्रचार सभा संपन्न झाली.

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
फुलंब्री;फुलंब्री आणि परिसराचं किंबहुना आपल्या संपूर्ण भागाचं वैभव असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना या भाजप नेत्यामुळे बंद पडून, विकायची परिस्थिती आली आहे. आम्ही अनेकदा तो कारखाना चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु या भाजपने त्यात खोडा घातला. आणि आपल्या भागातून ऊस पीक हद्दपार करायला हातभार लावला. शेतकरी भिकेला लावण्याची जणू शपथ भाजपने घेतली आहे. या शेतकरी द्रोही सरकारला आणि या खासदाराला सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आली आहे. आणि ती तारीख आहे 13 मे…. या दिवशी पंजा समोरील बटन दाबून आपण सर्व मायबाप जनतेने मला आशीर्वाद द्यावा, अशी विनंती करतो.
याप्रसंगी काँग्रेस सेवादल प्रदेशाध्यक्ष मा.विलासबापू औताडे, प्रभाकर मते पाटील, नाना पा. पळसकर,
जगन्नाथ पवार, सोमिनाथ करपे, विश्वास भैय्या औताडे, सुभाषराव गायकवाड, बोरसे सर, संदीप बोरसे, वरुण पाथ्रीकर, जालींधर ढाकणे, सिध्देश्वर भागवत, शंकर उबाळे,  ज्ञानेश्वर जाधव, गोविंद गायकवाड, धोंडीभाऊ जाधव, योगेश पाथ्रीकर, गणेश काळे, सुदाम भाऊ मते, ज्ञानेश्वर मते, डॉ इद्रीसजी सोळंके,सोमीनाथ मते-सरपंच बिलडा, अशोक पवार, दिलीप देशमुख, दिलीप मचे सोयगाव,भैय्यासाहेब जाधव, सुभाष निकम, लहु पा. मानकापे, अशाक बेळे, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती सोयगाव तालुका उपाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी बोलताना दिली.
0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *