अंधारी व भवन येथील प्रचार सभेत डॉ. कल्याण काळे यांचा विश्वास
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर;अंधारी व भवन येथे विकासाच्या नावाखाली केंद्रातील भाजप सरकारने मागील दहा वर्षांत केवळ थापा मारण्याचे काम केले आहे. महागाई, बेरोजगारी वाढली असून, मालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनता या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचा विश्वास जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी बुधवारी येथे अंधारी येथे बोलताना व्यक्त केला.
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जाज सोमवारी बदनापूर तालुक्यातील रोषणगाव, बाजार गेवराई बाजार, तेलगाम जिल्हा परिषद गट व बदनापूर शहराची प्रचार सभा अंधारी व भवन आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, राष्ट्रबादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आमदार संतोष सांबरे, डॉ.इद्रजीत सोळंके फर्दापूर,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप मचे,तालुका उपाध्यक्ष दिलीप देशमुख, सुनील माकोडे, पत्रकार रहीम खान पठाण,प्रमोद कोते,शिवसेना राजेंद्र राख, माजी नगराध्यक्ष ववलू चौधरी, जयप्रकाश चव्हाण, बाबूराव पवार, भानुदासराव घुगे, बाबासाहेब डांगे, दीपक डोंगरे, भास्कर मगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कल्याण काळे पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी गावागावात प्रत्येक घरापर्यंत पोहचून केंद्रातील भाजपा सरकारला खाली खेचण्यासाठी मतदारांशी संपर्क साधून महाविकास आपाडीच्या विजयासाठी प्रयत्न करावा. तत्पूर्वी राजाभाऊ देशमुख, भास्करराव अंबेकर, डॉ. निसार देशमुख, माजी आमदार संतोष सांबरे, बबलू चौधरी
आदींनी केंद्र आणि राज्यातील सरकारच्या कारभारावर टीका करून डॉ. कल्याण काळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी ठोंबरे, राम शिरसाठ, रमेश शिंदे, कैलास चव्हाण, विजय जन्हाड, भगवान कदम, लक्ष्मण म्हसलेकर, बाबासाहेव डांगे, अंकुश शिंदे, चितळकर, राजेंद्र जैस्वाल, शेळके, श्रीराम कान्हेरे, राजेंद्र शिनगारे, देहुजी जताड, रामकिसन मेंढरे, अरुण पैठणे, शिवाजी कहाड, संभाजी शेळके, परमेश्वर गोते, भारत मदन, भास्कर शिंदे, पद्माकर पढ्छ, संतोष नागे आदी मोठ्या उपस्थित होते.
Users Today : 20