हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात वीर पत्नी गोदावरीताई राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०१
मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक स्व,नारायणसिंह राजपूत यांच्या वीर पत्नी श्रीमती
गोदावरीताई नारायणसिंह राजपूत यांच्या हस्ते येथील
पालिकेच्या हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात महाराष्ट्र दिनी बुधवार(ता,०१)रोजी ध्वजारोहण करण्यात आले, राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत ही वाजविण्यात आले,या प्रसंगी  ऊपमुख्याधिकारी राहुल साठे,महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,दशरथ बनकर,स्वातंत्र्य सौनिक कुटुंबीय श्रीमती कमलाबाई लोंढे,श्रीमती भोसले ताई,श्री मिटकरी,श्री, देशपांडे,मोती हिवाळे, तसेच न,प,कर्मचारी स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन,जयपाल राजपूत, वाल्मिक शेटे, अरुण कुलकर्णी,डॉ,सविता निकाळे, मिलिंद साळवे,शंकर जोरे,व अन्य कर्मचारी उपस्थित होते,नगरपालिका कार्यालयात ऊप मुख्याधिकारी राहुल साठे यांनी ध्वजारोहन केले,या ठिकाणी कार्यक्रम संपल्यावर धोंडीरामसिह राजपूत यांनी मतदार जागृती करून सर्वांना येत्या निवडणुकीत मतदान करण्याचे व लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले,या प्रसंगी डॉ,निलेश भाटिया,स्वप्नील जेजुरकर,सखाहरी बर्डे,आर,पी,क्षीरसागर, एम,आर,गणवीर,गंगारामसिंह राजपूत,यांच्या सह न,प,कर्मचारी उपस्थित होते, शहराच्या ईतर कार्यालयात कार्यालय प्रमुख यांनी ध्वजवंदन करून महाराष्ट्र दिन साजरा केला,या कार्यक्रमाचे सूत्र संचलन धोंडीराम ठाकूर यांनी केले आभार अरुण कुलकर्णी यांनी मानले.
0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *