छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये दि.२/५/२०२४ रोजी मतदान विषयी जनजागृती करण्यात आली.रवळा, जवळा येथे जालना व छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना विधानसभा अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अजिंठा वनपरिक्षेत्राचे अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगर निवडणूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्राचे अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विद्यार्थ्यांनी रवळा,जवळा मध्ये मतदान जनजागृती रॅली काढून सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो…, वोट देणे जाना है… देश को आगे बढाना है… अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. यावेळी नागरिक, या मतदार लोकांना या रॅलीतून मतदान करण्यासाठी जागृती करण्यात येत होती. रॅलीमधील विद्यार्थी जनजागृती करीत असल्याचे पाहून मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह रवळा, जवळा येथे निर्माण झाला.शाळेच्या प्रांगणापासून रॅलीला सुरुवात झाली.पुन्हा गावात व शाळेच्या च्या प्रांगणात येऊन रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये मतदार जनजागृती वनविभागाचे पथक प्रमुख निलेश सोनवणे, वनपाल अविनाश राठोड यांनी
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गावोगावी जावून मतदानाचे महत्तव व मतदान आपला हक्क बजावण्याची माहीती वनविभागाच्या कर्मचाम्यांनी दिली. सदरील कार्यक्रमास वनपाल पी.क.शिंदे वनरक्षक शितत्य जाधव,वनरक्षक पी.ए. गवळी, व वनमजूर राजू काळे, व गावातील ग्रामस्थ जसे संभाजी पवार, कृपाल नाईक, नवनाथ सांगळे, दिनेश जाधव इ. उपस्थित होते.अशी माहिती संभाजी पवार यांनी बोलताना दिली.
Users Today : 20