बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने उमेश इंगळे यांचा सत्कार

Khozmaster
1 Min Read
अकोला प्रती – १ मे जागतिक कामगार दिना निमित्त्य बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने असंघटीत मजूर मेळाव्याचे आयोजन आबासाहेब खेडकर सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी कामगारांसाठी झटणारे सामाजिक क्षेत्रात व रुग्णसेवेत सदैव तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार (गौरव) करण्यात आला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अनुराधा ढिसाळे, उ‌द्घाटक कल्पना सुर्यवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा सहायक आयुक्त विठ्ठल देवकते, विजय परतवार, देविदास निकाळजे, प्रदिप वखारीया,शिवसेना जिल्हा अध्यक्ष अश्विन नवले, शाहिर वसंत मानवटकर उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी केले.
0 9 4 6 5 7
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *