छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापुर तालुक्यात सातत्याने गुन्हेगारी कारवाई करून नागरिकांमध्ये दहशत माजवणा-या कुख्यात गुन्हेगाराला एम.पी.डी.ए. कायद्याचे अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द केले आहे .. मा. पोलीस अधीक्षक यांनी गुन्हेगाराविरूध्द कठोर भुमिका घेवुन आतापर्यंत एकुण 11 गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. खाली एक वर्षासाठी स्थानबध्द करून गुन्हेगांराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस ठाणे वैजापुर हद्यीतील ईसम नामे राहुल गणेश शिंदे वय 26 वर्षे रा. वडारवाडा, वैजापुर ता. वैजापुर, जि. छत्रपती संभाजीनगर याचे विरूध्द पोलीस ठाणे वैजापुर येथे सन -2019 ते 2024 पर्यंत सातत्याने गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल असुन त्याचे गुन्हेगारी पार्श्वभुमीमुळे त्याला सन- 2021 व सन- 2023 मध्ये एक वर्षासाठी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारागृहात स्थानबध्द करण्यात आले होते. त्याचवेर पोलीस ठाणे वैजापुर येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) पो.स्टे. वैजापुर कलम 376,376 (2) (F) (N) भादंवी (01 गुन्हा)
2) पो.स्टे. वैजापुर कलम 392, 34 भादंवी (01 गुन्हा)
3) पो.स्टे. वैजापुर कलम 394, 341 भादंवी ( 01 गुन्हा)
4 ) पो.स्टे. वैजापुर कलम 326, 324, 323,504,506 भादंवी ( 03 गुन्हे )
5) पो.स्टे. वैजापुर कलम 324, 323,504,506 भादंवी ( 03 गुन्हे )
6) पो.स्टे. वैजापुर कलम 354,324, 323,504,506 भादंवी ( 01 गुन्हा )
7)पो.स्टे. वैजापुर कलम 323,504,506 भादंवी व कलम 4,25 शस्त्र अधिनियम ( 01 गुन्हा )
8) पो.स्टे. वैजापुर कलम 160 भादंवी अशा प्रकारे गंभीर गुन्हे दाखल असुन त्याचेवर कलम 110 (ई) (ग) फौजदार प्रक्रिया संहिता अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचेवर बलात्कार, जबरी चोरी, दरोडा, स्त्रियांचा विनयभंग करणे, जबर दुखापत करणे, घातक शस्त्रानी इच्छापुर्वक दुखापत करणे, व चोरी, करणे, असे शरिराविरूध्द व मालाविरूध्दचे एकुण 12 गुन्हे दाखल असुन तो बेकायदेशिर कृत्ये करून धाक-दपटशा करण्याचा सवईचा असुन त्याच्या अशा कृत्यामुळे सामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातारण निर्माण झाले होते.
त्याचे गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याचेविरूध्द वेळोवेळी प्रतिबंध कारवाई सुध्दा करण्यात आली होती. परंतु याबाबीचा त्याच्येवर काहि एक परिणाम न होता त्याने त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवाई चढत्या क्रमाने चालुच ठेवलेल्या होत्या.
त्याअनुषंगाने एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टिविटी) कायद्यानुसार म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, धोाकदायक व्यक्ती, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, वाळु तस्कर, व अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे, दृक श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडीओ पायरेसी) असे विद्यातक कृत्य करणा-या व्यक्तींना आळा घालण्याबाबत एम.पी.डी.ए. कायद्यान्वये त्याचे गुन्हेगारी व धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करणे आवश्यक होते.
यावरून मा.श्री. दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 26/4/2024 रोजी आरोपी राहुल गणेश शिंदे वय 26 वर्षे रा. वडारवाडा, वैजापुर ता. वैजापुर, जि. छत्रपती संभाजीनगर याचे विरूध्द एम.पी.डी.ए अधिनियम 1981 चे कलम 3 (1), 3(2) अन्वये स्थानबध्दतेचा आदेश पारित केला. त्यावरुन त्यास दिनांक 01/05/2024 रोजी स्थानबध्दतेचे आदेश तामिल करून मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.सदरची कारवाई मा.मनीष कलवानीया, पोलीस अधीक्षक, मा.सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक,यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती महक स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापुर, श्री. सतिष वाघ, पोलीस निरीक्षक,स्था.गु.शा श्री. शामसुंदर कौठाळे,पोलीस निरीक्षक, वैजापुर, पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, दिपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, संजय तांदळे, दिपक सुरोसे, प्रशांत गिते यांनी केली आहे.
Users Today : 15