कवी सुनील मोरे यांची कवितेतून मतदान जनजागृती

Khozmaster
2 Min Read
सहज सोप्या रचनेतून ग्रामीण मतदारांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथील लोकसभा निवडणुक – २०२४ जळगाव जिल्हा परिषदेचे
स्विप जिल्हा नोडल अधिकारी  तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा . पं.विभाग )
अनिकेत पाटील यांचे सहाय्यक सुनिल विश्वंभर मोरे  हे आपल्या काव्यरचनेतून मतदार जनजागृती करीत आहेत .
       ”तात्या दादा भाऊ
मिळूनी सारे मतदानाला जाऊ
आपण सगळे मतदानाला जाऊ “
अशा साध्या सहज रचनेतून ते मतदारांना मतदानासाठी जागृत करीत आहे .
जिल्हा परिषदेमधील  दैनंदिन कामाचा व्याप सांभाळून ते आपला काव्य छंद जोपासत आहेत.
यापूर्वीही त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या , व्यसनमुक्ती , बालविवाह प्रतिबंध , पाणी वाचवा अशा विविध सामाजिक विषयांसह शासकीय योजनांवर काव्यरचना केल्या आहेत .
     त्यांच्या काव्य साधने बद्दल त्यांना, महाराष्ट्र शासनाकडून व विविध संस्थांकडे सन्मानित करण्यात आले आहे .
‘लेक वाचवा ‘ या कवितेचे पोस्टर्स तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी प्रकाशित करून जिल्हाभर त्यांनी जनजागृती केली आहे .
‘शासनाची विनंती सकल जनाला मतदानाला सगळे चला
तुम्ही सगळे मतदानाला चला ‘ ही  कविता सामान्य मतदारांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवत आहे .
      “मला काव्यरचनेचा छंद असून कामाच्या व्यापातून वेळ काढत  मी कविता करीत असतो .मतदानाचा टक्का वाढावा ,  यासाठी प्रचार व जनजागृती प्रसिद्धी म्हणून ‘मतदानाला सारे चला ‘ काव्यरचना सादर केली .
कवी सुनिल विश्वंभर मोरे . ( सुमो ) पहूर
जिल्हा परिषद , जळगांव
0 8 9 4 7 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *