ज्या घरात आई-बाप आपल्या लेकरांना वेळ देत नाही त्या घरात तरुणपणी लेकर थांबत नाहीत—- हभप— समाधान महाराज शर्मा

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०४
आज आई-बाप पैशाच्या मागे सारखे धावत असून त्यांना आपल्या पोटच्या लेकरांकडे
लक्ष द्यायला वेळ नाही,आपली पोटची पोर,पाळणा घरात किंवा परक्यांच्या हवाली करून  दिवसातील दहा बारा तास आई-बाप घराबाहेर राहतात अशा आई -बाप विषयी एव्हढेच म्हणता येईल की,”ज्या लेकरांना जन्म दाते आई-बाप वेळ देत नाही,अशा घरातील मुले-मुली मोठी झाली की,घरात थांबत नाहीत, त्यांच्यावर बालपणी जे संस्कार आई-वडिलांकडून व्हावयास हवे ते होत नाही,व म्हणून या मुलां-मुलींना आई-बापाची किंमत कळत नाही,म्हणून मनात आले तेंव्हा ही मुलं घर सोडून पळून जातात, अशा समयी   आई बापाना जिवंत असे पर्यन्त पश्चाताप करावा लागतो”असे  प्रतिपादन  प्राप्त परिस्थिती ला अनुसरून वैजापूर येथील श्री साईभक्तबहुउद्धेशिय सेवा भावी संस्थेचे च्या वतीने आयोजित श्री शिवमहापुराण कथेचे  पाचवे पुष्प गुंफताना हभप समाधान महाराज शर्मा यांनी शुक्रवार(ता,०४)रोजी
जि, प,प्रशाला च्या मैदानावर केले,आरंभी महाराजांचे पूजन शहरातील जेष्ठ नागरिक काशिनाथ शेठ भावसार,गोविंदशेठ दाभाडे,धोंडीरामसिंह राजपूत, श्री
बहिरुवाले,गोकुळ पेहरकर,गणेश अनर्थे, रवींद्र आप्पा साखरे, अनंत अधिकार यांनी केले,सेवेकरी महेंद्र काटकर, राम उचित,मनोज गायकवाड,मनोज दौडे,उमेश राजपूत,प्रशांत गायकवाड यांनी सहकार्य केले,या कथेस महिला वर्गाची मोठी गर्दी असून पुरुष ही या कथात रमत आहे,रविवार पर्यंत या कथा चालणार आहेत,जेष्ठ महिला नागरिक अलका साखरे,अंजली जोशी ,संध्याताई ठोंबरे,श्रीमती साठे,श्रीमती काटकर ,यांच्या सह जेष्ठ महिला ही खूप मोठ्या संख्येने कथेत उपस्थित राहत आहेत, सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत करीत असून सुधीर लालसरे सहकार्य करीत आहे.
0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *