मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज.धोत्रा भनगोजी. (चिखली) :—धोत्रा भनगोजी.येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे युध्द पातळीवर प्रयत्न !सुरू.
धोत्रा भनगोजी येथील पाणीपुरवठा गाव तलाव कोरडा पडल्याने जवळजवळ बंद झाला होता. याची दखल खोज् मास्टर न्यूज ने घेताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आणि कवळा धरण प्रकल्पावरुन पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. धोत्रा भनगोजी येथील गाव तलाव हा फेब्रुवारी महिन्यात कोरडा पडणार यासाठी ग्रामपंचायतीने वेळीच पावले उचलून कवळा धरण प्रकल्पावरुन पाणीपुरवठा सुरु करावा. पाणी पुरवठा सुरु न झाल्यास भिषण पाणी टंचाई असे वृत्त प्रकाशित झाले होते. परंतू सदर कामात दिरंगाई झाल्याने अखेर पाणीपुरवठा प्रभावीत झाला महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हातपंप नादुरुस्त आहेत. २० लिटर पाण्यासाठी १५ रुपये खर्च करून तहान भागवावी लागत आहे. तर वापरासाठी पाणी टँकरने घ्यावे लागते. . पाणी टंचाईची तिव्रता पाहता ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांनी तातडीची बैठक बोलावून.मा. उपविभागीया अधिकारी साहेव ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चिखली
जल जीवन मिशन अंतर्गत मौजे धोत्रा भनगोजी येथे पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनचे काम लवकरात लवकर सुरु करणे बाबत.उपरोक्त विषयास अनुसरुण की, जल जीवन मिशन अंतर्गत मौजे धोत्रा भनगोजी येथे पाणी पुरवठा पाईप लाईनचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावी. कव्हाळा येथील धरणावरुन येणारी पाईप लाईन ही संबंधीत शेत-यांच्या शेतातुन लवकरात लवकर करुन घ्यावी जेणे करुन समोर पावसाळयाचे दिवस असल्याने शेतक-यांनी जर शेतीची मशागत केली तर ते शेतकरी पाईप लाईन चे काम होऊ देणार नाही. व गाव पिण्याच्या पाण्यापासुन वंचित राहील. यासस्वी जबाबदार संबंधीत ठेकेदार व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चिखली राहील, याची गांभीयाने नोदं घ्यावी. असे पत्र ग्रामपंचायत सरपंच /सचिव यांच्या वतीने देण्यात आले होते राहिलेले काम त्वरीत पुर्ण करुन राहिलेल्या पाइपलाइनचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. असे संबंधित अधिकाऱ्याकडून आश्वासने मिळाले होते.
उपसरपंच पती. मा. संदीप सर उनाळे यांनी मोलाची भूमिका बजावून सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाईपलाईन जोडण्याची तातडीचे काम सुरू केले आहे., यावेळी ग्रामपंचायतचे संदीप सर उन्हाळे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कापसे ग्रामपंचायत चे विवेक पवल, बळीराम काळे, आदी उपस्थित होते. अवघ्या काही दिवसातच गावात पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा जनसामान्याकडून होत आहे.
Users Today : 18