कृषीमाल भावांतर योजना वरदान ठरणार!

Khozmaster
3 Min Read
# उपमुख्य मंत्र्याची खामगावातुन घोषणा,  #सुरूवात बुलडाण्यातुन करा ,
स्वप्निल देशमुख
वानखेड : यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका पिकांना बसला, उत्पन्न कमी झाले व भावातही शेतकरी लुटला गेला.  शासनाच्या धोरणामुळे शेतमालाला भाव कमी मिळाले. अशातच उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेचे सुतोवाच केले. “चार हजार कोटी रूपयांची योजना आणुन सोयाबीन व कापुस उत्पादकांना शेतमालाच्या भावातील फरक दिला जाईल” अशी घोषणा एप्रिल मधे खामगावातुन केली. या योजनेतुन मदतीची आशा शेतकरी बांधवांना आहे.
पश्चिम विदर्भातील प्रमुख सोयाबीन व कापुस ही प्रमुख पिके आहेत. यावर्षी  निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले तर शासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे शेतमालाला भाव कमी मिळाले.  यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी शासनाच्या भूमिकेवर नाराज आहेत. शेतमालाला वाजीव भाव देऊन उत्पन्न दुप्प्पट करण्याची हमी देण्यात आली पण ती पूर्ण करताना शासन खोटे पडले. मध्यप्रदेश शासनाने ही योजना राबवल्याने तेथिल शेतकरी बांधवांना मदत झाली. तिच योजना महाराष्ट्रात लागू होईल या घोषणेने शेतकरी आनंदून गेले आहेत. प्रत्यक्ष मात्र शासनाच्या घोषणा फसव्या ठरल्या असाही अनुभव शेतकरी बांधवांना आहे. दुष्काळी मदत,  हेक्टरी पन्नास हजार मदत, पिक नुकसान भरपाई, कर्जमाफी अशा विविध योजना बारगळल्याचे नंतर दिसुन आले. अत्यल्प पावसामुळे दुष्काळ असताना त्या सुविधा शेतकरी बांधवांना मिळाल्या नाहीत. पिकविमा जेमतेम मिळत आहे. कर्जमाफी ची कित्येक प्रकरणे खितपत असल्याने शासन शेतकरी बांधवांप्रती उदासिन असल्याचे दिसुन आले. अशातच भावांतर योजनेचे सुतोवाच राज्य शासनाने उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यमातुन केल्याने शेतकरी आशादायी आहे. ही योजना कशी कार्यान्वित होईल हे आचारसंहितेनंतर लक्षात येईल तुर्त ही योजना कार्यान्वित होणे आवश्यक आहे .
” उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खामगावच्या सभेत भावांतर योजनेचे सुतोवाच केले होते. शेतमालाचे भाव, नापिकी व शेतकरी बांधवांच्या समस्या पाहता ही एक चांगली योजना आहे. शासन स्तरावर ही योजना कशी राबविली जाते याकडे लक्ष आहे. यामागे पडेल भावाने शेतमाल विकलेल्याना फायदा होईल.
– वीरेंद्र झाडोकार पातुर्डा ,
” लोकसभा निवडणूकीत शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी बांधवांचा संताप दिसुन आल्याने मोठी वोट-बैंक दूर जाऊ नये यासाठी ही घोषणा केली आहे . शासन उदासीन असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शासनाचा एकंदर अनुभव पाहता ही योजना मृगजळ ठरणार  अशी शंका आहे.
– रवि पाटील,  संचालक बाजार समिती संग्रामपूर –
 ” या योजनेमुळे शेतकरी बांधवांना फायदा होईल. ही योजना औटघटकेची ठरू नये यासाठी शासनाने विभागवार डाटा गोळा करून पेरणीपूर्व मदत खात्यात जमा होईल या दिशेने प्रयत्न करावेत. वयोवृद्धा च्या अडचणी पाहता  ईकेवायसी ला सक्षम पर्याय आणावा.
– गजानन ढोकणे शेतकरी पातुर्डा
भावांतर योजनेसाठी ग्रामसेवा सोयायटी व ईतर शेतकरी संस्था व संघटनांच्या माध्यमातुन पाठपुरावा करू.
– प्रकाश देशमुख, सदस्य ग्रामसेवा सोयायटी पातुर्डा
0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *