कवठे येमाई येथे श्री गुरुचरित्र पारायण सोहळा उत्साहात सुरु

Khozmaster
1 Min Read
कवठे येमाई दि. ०५ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) श्री गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कवठे येमाई यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त कवठे येथील श्री दत्तमंदिर प्रांगणात श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून. मंगळवार दि.३० पासून पारायण सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. सोमवार दि. ०६ ला  या सोहळ्याची सांगता होणार असून भाविकांसाठी श्री स्वामी समर्थ केंद्र कवठे यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
कवठे येमाई ग्रामस्थ,महिलांच्या सहकार्यातून मागील बारा वर्षांपासून कवठे येथे स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू असून या माध्यमातून समाज उपयोगी  उपयोगी विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये प्रत्येक रविवारी येथील ग्रामपंचायत सभागृहात बालसंस्कार वर्ग घेतला जातो. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी या उद्देशाने त्यांना श्री गणेश व सरस्वती स्तोत्र, आज्ञाधारकपणे वागण्याची शिकवण, व्यायाम, खेळाचे प्रकार शिकवले जातात. यामध्ये सुमारे १०० विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी होतात. तसेच प्रत्येक मंगळवारी साप्ताहिक आरती, समस्या निराकरण आणि उत्तम मार्गदर्शन सेवेक-यांना लाभते. श्री गुरुचरित्र पारायण सोहळा एक उच्च कोटीची सेवा मानली जाते. विजय कुलकर्णी व दत्तात्रय सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुचरित्र पारायणासाठी दररोज पहाटे चारला ८२  स्वामीभक्त सेवेकरी सहभागी होत आहेत.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६
0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *