कवठे येमाईत जिल्हा बँकेचे एटीएम सुरु – नागरिकांना मोठा दिलासा

Khozmaster
2 Min Read
??????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
कवठे येमाईत जिल्हा बँकेचे एटीएम सुरु – नागरिकांना मोठा दिलासा 
कवठे येमाई दि. ०५ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे व अष्टविनायक महामार्गावरील महत्वाचे व मोठी व्यापारी बाजार पेठा असलेले गाव असलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे एटीम नुकतेच सुरू झाले आहे.तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक माजी आमदार पोपटराव गावडे व तत्कालीन संचालिका डॉ.वर्षाताई शिवले यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने तसेच नागरिकांच्या कवठे येमाई येथे जिल्हा बँकेने एटीम सुरु करावे याबाबत आमच्या दैनिकातून वृत्त देण्यात आले होते.याची दखल घेण्यात आली असून नुकतेच पुणे जिल्हा बँकेच्या कवठे येमाई शाखेत हे एटीएम सुरु झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
         कवठे येमाईत कॅनरा बँकेचे एटीएम आहे.पण ते वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांची पैसे काढण्यासाठी मोठी गैरसोय होत होती.आता जिल्हा बँकेचे एटीएम ते ही ग्राउंड फ्लोअर ला सुरू झाल्याने एटीएम कार्ड धारक,जेष्ठ नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते किसन हिलाळ,अण्णा पळसकर व उपस्थित नागरिकांनी सांगितले
——- दीपक रत्नपारखी – माजी सरपंच कवठे येमाई 
 ” कवठे येमाई येथे गावात पुणे जिल्हा बँकेचे एटीएम लवकरच सुरु झाल्याने जिल्हा बँकेला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. गावात याआधी एकच एटीएम असल्याने त्या एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी नागरिकांना अनंत अडचणींना तोड द्यावे लागत होते.अनेक वयस्कर शेतकरी,महिला, एटीएम धारकांना गावात बस स्टॅंड नजीक असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बाजूलाच आता एटीएम सुविधा सुरु झाल्याने बँकेत गर्दी न करता एटीएम मधून पैसे काढण्यास मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.”
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६
0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *