सपोनि प्रफुल्ल साबळे 07 आरोपी ताब्यात तर 6,28,440/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे चोरटया मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचे धाडसत्र सुरू असुन जिल्हयातील दुर्गम भागातील शेतामध्ये छुप्यामार्गाने चालणा-या जुगार अड्यांची गोपनीय माहिती काढुन त्यांचेवर मा. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकांद्वारे छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात येत आहे.वरिष्टाच्या आदेशानुसार अनुषंगाने सपोनि प्रफुल्ल साबळे यांचे विशेष पथकास दिनांक 03/05/2024 रोजी गुप्त माहिती मिळाली कि, पोलीस ठाणे फर्दापुर हद्दीतील फर्दापुर शिवारीतील रवि माणिक देवकर यांचे शेतात असलेल्या पत्र्याचे खोपडी मध्ये काही ईसम हे बल्बच्या उजेडात 10 ते 12 ईसम हे तिरट व झन्ना मन्ना नावाचा जुगार हा पत्त्यावर खेळत व खेळवित आहे अशी माहिती मिळाली होती.यावरून पथकाने कारवाईच्या अनुषंगाने शेताचे संपूर्ण परिसराची बारकाईने व छुप्या पध्दतीने पाहणी केली असता तेथे 9 ते 10 मोटरसायकल या उभ्या असलेला दिसुन आल्या तसेच शेतातील पत्राचे शेड छोटया बल्चच्या उजेडात काही व्यक्तींची संशयीत हालचाल नजरेस पडली. सपोनि प्रफुल्ल साबळे यावरुन सापळा लावुन छापा मारण्याचे नियोजन केल्यानुसार पोलीसांचे पथकांनी दि.४/५/२४ रोजी रात्री अंदाजे 22:30 वाजेच्या सुमारास रात्रीच्या अंधारात पथकांने लपत छपत जावुन अचानक शेतातील पत्र्याचे शेडला घेराव टाकुन छापा टाकला असला, काही ईसम हे पत्यावर तिर्रट व झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना दिसुन आले. पोलीसांनी अचानक झडप घालुन कारवाई केल्याने जुगारी ईसमांची धांदल उडाली व यातील काही ईसम हे अंधाराचा फायद्या घेवुन शेतातील बंधा-याने मिळेल त्या रस्त्याने सैरावैर पळत सुटले आणि प्रसार झाले परंतु तरीही पथकातील पोलीसांनी त्यांचा अंधारात पाठलाग करून त्यांतील 07 जुगा-यांना ताब्यात घेतले आहे.यामध्ये 1) गणेश जगन्नाथ गांवडे वय 34 वर्षे (जुगार अड्डा चालविणारा) 2) दिपक राजु काकडे वय 34 वर्षे 3) गफार गुलाव पठाण वय 39 वर्षे 4) शेख आरिफ शेख हुसैन वय 29 वर्षे 5)दिपक जनार्धन पवार वय 29 वर्षे 6) गणेश शेषराव सावळे वय 34 वर्षे 7) अनिल देविदास वाघ वय 33 वर्षे सर्व रा. फर्दापुर नुमद कारवाई मध्ये रोख 88,440/- रुपयांसह 09 दुचाकी वाहने, 04 मोबाईल फोन, पत्ताचे कॅट, इतर जुगाराचे साहित्य असे एकुण 6,28,440/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे चिकलठाणा येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस ठाणे फर्दापुर हे करित आहेत.नमुद कारवाई ही मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील स.पो.नि.
सुदाम सिरसाठ,सपोनि प्रफुल्ल साबळे, पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाथे,पोलीस अंमलदर नवनाथ कोल्हे, रामेश्वर धापस, गणेश सोनवणे यांनी केली आहे.यामळे फर्दापूर परिसरात इतर झन्ना -मन्ना खेळणाऱ्या धाबे चांगलेच दणाणले आहे यामुळे फर्दापूर पोलिस ठाण्याचे ग्रामस्थ यांच्या कडून कौतुक केले जात आहे.
Users Today : 15