अरेरे! क्रिकेट खेळताना चेंडू गुप्तांगावर लागला; शंभू कळवळला, जागीच कोसळला, मृत्यूनं शोककळा

Khozmaster
2 Min Read

पुणे: सध्या देशभरात आयपीएलचा फिवर सुरु आहे. मे महिना असल्यानं शाळकरी मुलांच्या सुट्ट्या सुरु आहेत. सकाळ ते सायंकाळपर्यंत मुलं गल्लीबोळात, मैदानात क्रिकेट खेळताना दिसतात. सुट्टीत मुलं खेळण्याचा आनंद लुटत असताना पुण्यात मात्र एक दुर्दैवी घटना घटना घडली. क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. ही घटनालोहगावमधील जगद्गुरू स्पोर्ट्स अकॅडमी मैदानात गुरुवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११ रा. लोहगाव, पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

शाळेला सुट्टी असल्याने सहावीमध्ये शिकणारा शंभू गुरुवारी (२ मे) सायंकाळी आपल्या घरातील इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. फलंदाजानं मारलेला चेंडू शंभूच्या गुप्तांगावर लागला. त्यामुळे तो मैदानात पडला. त्यानंतर तो उठून उभा राहिला खरा, मात्र त्याला वेदना असह्य झाल्या आणि तो पुन्हा खाली कोसळला. त्यामुळे इतर मुलं गोंधळून गेली. त्या मुलांनी आरडाओरडा केल्याने जवळच्या नागरिकांनी शंभूला खासगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आले.

शंभूच्या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समजणार असल्याचं पोलिसांनी सांगितले. शंभूच्या अकाली मृत्यूमुळे खांदवे कुटुंबीयांसह लोहगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. शंभू हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे यांचा पुतण्या होता.

0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *