सकाळी तरुणाला संपवलं, २४ तासांत हत्येचा उलगडा, जवळच्या व्यक्तीनं घडवलं कृत्य, कारण काय?

Khozmaster
2 Min Read

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात असलेल्या स्केटिंग ग्राउंडवर शनिवारी सकाळी गणेश दराखे या व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली होती. आता सिडको पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात या हत्येचा उलगडा केला आहे. यात चार आरोपींसह एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

एसबीओ शाळेमागील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाबाहेर कौटुंबिक वादातून ३५ वर्षीय तरुणाची भर रस्त्यात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. शनिवारी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली होती. ही हत्या कौटुंबिक वादातून झाली असावी असा अंदाज पोलिसांना आला होत. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू केली होती. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली होती.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, की गणेश जगन्नाथ दराखे वय ३५ असं मृत व्यक्तीचं नाव आहे. गणेश हे कुटुंबीयांसोबत चिकलठाणा परिसरात राहत होते. दोन महिन्यापूर्वी त्यांनी स्वतःचं घर विकून ते पत्नी, लहान मुलगा आणि मुलगी यांच्यासह एन अकरा परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. शनिवारी कामावर जाण्यासाठी घरातून जळगाव रोडच्या दिशेने ते निघाले होते. यावेळी त्यांचा तिघांनी पाठलाग करुन प्रमोद महाजन क्रीडा संकुलाजवळ त्यांना मारहाण केली. एकाने गणेशांच्या गळ्यावर चाकूने वार केला.ही भयंकर घटना मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या काही महिलांनी पाहिला. त्यांनी आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. महिलांचा आवाज ऐकून काही नागरिक तेथे आले. या घटनेची माहिती त्वरित पोलिसांना देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.दुपारी बारा वाजता हत्या केलेल्या गणेशची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी दोन मुलं घरी होती, मात्र पत्नी बाहेर गेली होती. पोलिसांनी बराच वेळ तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बराच वेळानंतर ती पोलीस ठाण्यामध्ये आली.

असा झाला हत्येचा उलगडा

दरम्यान कुटुंबातील व्यक्तीने हत्या केल्याची कुणकूण पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील व्यक्तींचा कसून तपास करण्यासाठी पथकं रवाना केली होती.

0 9 3 8 1 8
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *