छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव;-तालुक्यासह राज्य भरात उन्हाचा पारा खूप वाढला असून उन्हाळा दिवसेंदिवस कडक होत
असल्याने रसाळ फळे,उसाचा रस, ताक,लस्सी आदी पेयांना पसंती मिळत आहे.
त्यातच सोयगाव व सावळदबारा परिसरात मधील घाऊक फळ बाजारात मोठ्या प्रमाणात फळे विक्रीसाठी दाखल होत असल्याने फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.बाजारात येणाऱ्या फळांचा रंग,दर्जा,चव उत्तम असल्याने ही फळे सोयगावकरांच्या पसंतीस उतरली आहेत.
सध्या फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला आहे. 100 ते 150 रुपये किलो भावाने आंबा मिळत आहे. कलिंगड स्वस्त फळ शिवाय
उन्हाळ्यात अतिशय उत्तम असल्याने बाजारात कलिंगडांना चांगलीच मागणी आहे. सफरचंदपासून पपईपर्यंत सर्वच फळे बाजारात उपलब्ध असून त्यांचे दरही थोडे कमी झाल्याने ग्राहकही सुखावले आहेत.
दरवर्षी नोव्हेंबरपासून बाजारात फळे येण्यास सुरुवात होते.
आता आंबे,द्राक्ष यांच्यासह पपई,पेरु, चिक्कू,कलिंगड, खरबूज या फळांची बाजारात चांगलीच आवक आहे. सफरचंदचा भाव १८० रुपये किलो आहे.मोठा कलिंगड ५० ते ८० रुपयांना आणि लहान कलिंगड ३० रुपयांना मिळतो.
सध्या रसभरे जाम ग्राहकांना आकर्षित करत आहेत. याशिवाय करवंद,जांभुळ हा रानमेवा,आंबा, फणसाचे गरे,ताडगोळे,नारळपाणी यांना ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याने यांचीही मागणी वाढली आहे.
उन्हाळी फळांमुळे आरोग्य चांगले राहते. शिवाय जांभळे,करवंदे या रानमेव्याचा आनंद वेगळा असल्यामुळे फळांची मागणी वाढत आहे.
फळांचे दर पपई (लहान) – ३० रुपये
• पपई (मोठा) – ६० रुपये• जांब -५० ते ६० रु. किलो• फणसाचे गरे – २०० रुपये किलो ताडगोळे – ५० रुपये (पाच नग)• केळी – ३० ते ४० रुपये डझन• चिक्कू प्रतिकिलो ६० रुपये
मोसंबी – १२० रु. किलो• खरबूज ३० रुपये नग द्राक्ष ८० रुपये किलो सफरचंद – १६० ते १८० रु. किलो झाला असून यात उन्हाळा दिवसेंदिवस कडक वाढत आहे रसाळे अनेक फळांची मागणी वाढली पण उष्णतेमुळे फळाची किमत घसरली आहे.विक्री करणाऱ्यांना तोटा कधी फायदा सहन करावे लागत आहे.
Users Today : 20