छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर,सावळदबारा व परिसरात येत्या काही आठ दिवसावर येऊन ठेपलेल्या जालना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फर्दापूर पोलिस ठाण्याच्या वतीने सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वतीने शिस्तबध्दरितीने दि.४/५/२०२४ रोजी सायंकाळी रूट मार्च सावळदबारा परिसरात काढण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकराची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सज्ज आहे, असा इशारा या रुट मार्च दरम्यान पोलिसांनी दिला.लोकसभा निवडणूक दि.१३ मे २०२४ च्या अनुषंगाने सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापूर,सावळदबारा व परिसरात डाभा, देव्हारी, टिटवी, पळसखेडा, नांदा तांडा, मोलखेडा, हिवरी, चारुतांडा, जामठी, घाणेगाव तांडा कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका व मतदान भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारामध्ये विश्वासार्हता वाढीस लागावी याकरिता सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात येत आहे. त्यानुसार शनिवारी फर्दापूर पोलिसांतर्फे रुट मार्च काढण्यात आला. या रुट मार्चमध्ये फर्दापूर पोलीस ठाण्यातील पोलीस सहाय्यक निरीक्षक एक, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक तीन, व ५ अंमलदार तसेच फर्दापूर पोलीस दाखल झालेल्या या रुट मार्च दरम्यान पोलिसांनी सावळदबारा मधील महत्त्वाची आदी ठिकाणी भेट दिली.फर्दापूर शहर पोलीस अधिकारी सपोनि प्रफुल्ल साबळे यांनी सावळदबारा येथे रुट मार्च विठ्ठल रुक्मिणी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक,मारुती मंदिर,टिपू सुलतान चौक,देशमुख गल्ली व -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा-पोलिस चौकी जवळ समाप्त करण्यात आले.. आचारसंहिता प्रश्नात कोणत्याही प्रवृत्तीची परिस्थिती निर्माण करणारी पोलीस यंत्रणा सज्ज आहे, असा आमचा सामना या रुट मार्च दरम्यान करण्यात आला.
विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीची काळात आचारसंहिता आहे .लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा,त्या दृष्टीने फर्दापूर व सावळदबारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला. यात पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाथे यांच्यासह तीन अधिकारी, २५ कर्मचारी तसेच होमगार्ड, दामिनी पथक, निर्भया पथक, वाहने, सीआर व्हॅन, पिटर मोबाइल आदी सहभागी झाले असल्याची माहिती बिट जमादार मिरखाॅ तडवी सावळदबारा यांनी बोलताना दिली.
Users Today : 21