छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात जालना,छत्रपती संभाजीनगर : लोकसभा
निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांना आपले न मतदानाचे केंद्र, यादीतील क्रमांक व आदीची माहिती असलेली मतदार चिठ्ठी वाटपास गेल्या सहा र दिवसांपासून सुरुवात झाली असल्याची माहिती प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.असून सर्व मतदारांपर्यंत निर्धारित काल- वधीत मतदार चिठ्ठी पोहोचत व्हावी, यादृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती अधिकारी भागवत गायकवाड व प्रा सुदाम जाधव सर यांनी दैनिक माझा मराठवाडा विभागिय संपादक गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार यादीत मतदान छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील एकूण व मतदारांची संख्या २० लाख ६१ र्व हजार २२० एवढी आहे. यात पुरुष १० लाख ७७ हजार ८०९, महिला ९ लाख ८१ हजार ७७३ इतर १२८ तर सर्व्हिस मतदारांची संख्या १ हजार ५१० एवढी आहे. तर संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, पैठण या तीन विधानसभा क्षेत्राचा समावेश हा जालना लोकसभा मतदारसंघात आहे. या तिन्ही मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या १० लाख ६ हजार ४८७ आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार चिठ्ठ्यांचे वितरणास सुरुवा झाली माहिती प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, मतदार यादीतील क्रमांक आदी माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी मतदार चिठ्या दिल्या जातात. मतदारांपर्यंत ह्या चिठ्ठ्या त्या त्या भागात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) शिक्षकवृंद यांच्यामार्फत वितरीत करण्यात येत आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊत पथकामार्फत मतदार चिठ्ठ्या पोहोचविण्यात काम केले जात असल्याचे भागवत गायकवाड व सुदाम जाधव यांनी नमद केले. दरम्यान, मतदारांनी आपापल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आपली मतदार चिड्डी प्राप्त करून घ्यावी व १३ मे रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रा जीवन कोलते पाटील यांनी केले आहे.
Users Today : 20