छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०५
“देशासाठी मतदान-तर रुग्णासाठी रक्तदान” मानवतेचे नाते जपू या-रक्तदान करू या””देशके हितमे मतदान-और मानवके हित मे रक्तदान”अशा घोषणा देत रक्तदात्याना देशासाठी “मतदान” तर रुग्णासाठी रक्तदान करा “असे आवाहन करीत वैजापूर येथे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ,हेडगेवार रुग्णालयातील डॉ,दत्ताजी भाले रक्त पेढी मार्फत रविवार(ता,०५)
रोजी रक्त संकलन करण्यात आले,साई भक्त बहुउद्धेशिय सेवा भावी संस्थेच्या वतीने श्री साई सच्चरीत पारायण व शिवमहापुराण कथा चालु आहेत याचाच एक भाग म्हणून सामाजीक बांधीलकी जपत रक्तदान शिबिर घेण्यात आले,त्यास शहरातील युवक तरुण व तरुणी नी भरभरून प्रतिसाद दिला,
या शिबिराचा प्रारंभ साईभक्त प्रेम राजपूत,व जी, टी, बसवेकर यांच्या रक्तदान ने सुरू झाला,उत्सव समिती कार्याध्यक्ष राजेंद्र लालसरे ,जेष्ठ नागरिक व साई भक्त धोंडीरामसिंह राजपूत,आयोजक प्रशांत साखरे,शैलेश
पोंदे,प्रेस फ़ोटोग्राफर विलास रामैय्या,सतीश कुलकर्णी
यांनी या शिबिराचे उदघाटन केले,रक्तदात्या योगिता सिरसाट,गौरी क्षीरसागर,अनघा आंबेकर ,रेणुका रमेश
जाधव, अश्विनी गायकवाड(पवार) देवव्रत साखरे,प्रन्यम दौडेयांनी सहकार्य केले,
दत्ताजी भाले रक्तपेढीचे सर्वश्री डॉ,मंजुषा कुलकर्णी,आप्पासाहेब सोमासे,सहकारी गजानन वाघ,सोनिया पाटील,आशा सिस्टर, यांनी रक्त संकलन केले,
Users Today : 20