अजिंठा घाटात अनेक तास वाहनधारक व पर्यटक ताटकळले; वाहतूक विस्कळित

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील अजिंठा जगप्रसिद्ध अजिंठा घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी एस.टी. बस पलटी होऊन झालेल्या अपघातानंतर पुन्हा शनिवारी दि .४/५/२४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन ट्रकचा अपघात झाला. हा अपघात किरकोळ होता, मात्र यामुळे मध्यरात्री तब्बल ४ ते ५ तास वाहतूक विस्कळीत झाली होती.रविवारी दिवसभर वाहतूक विस्कळीत झाल्याचा फटका जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसह या महामार्गावरून रहदारी करणाऱ्या वाहनांना बसला. रात्री अजिंठा, फर्दापूर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रफुल्ल साबळे
कर्मचाऱ्यांसह पोलीस मित्र ग्रामस्थांनी, प्रवाशांनी रहदारी सुरळीत करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले.जगप्रसिद्ध अजिंठा घाटासह नुकतेच सिमेंटीकरण झालेल्या छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गाची वाट लागली असून ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत कामे रखडलेले असल्याने आधीच मनस्ताप सहन करणाऱ्या वाहन चालकांना नवीन बनलेल्या अरुंद रस्त्यामुळे ठिकठिकाणी किरकोळ, गंभीर अपघाताला समोर जावे लागत आहेत. यात जिवितहानीसह वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान भोगावे लागत आहे. त्यातच भरीत भर म्हणून अरुंद बनलेल्या अजिंठा घाटात दररोज अपघात घडत आहे. त्यामुळे वाहतूक रहदारी विस्कळीत होण्याचे जणू सुत्रच बनल्याचे दिसून येत आहे. यामुळे अवालवृद्ध, महिला प्रवाशांसह पर्यटकांना अनेक तास वाहनधारक व प्रवासी यांना ताटकडावे लागत आहे.
0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *