बोगस काम करुन काढतात बिले प्रशासन मात्र साखर झोपेत
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे चालू असलेले कोल्हापूर बंधाऱ्याचे कामा अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे याकडे कोणी लक्ष देईल का असे मत अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे मराठवाडा विभागिय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत व विजय काळे तालुका अध्यक्ष सोयगाव यांनी व्यक्त केले आहे.सविस्तर माहिती अशी की सावळदबारा शिवारामध्ये गावालगत असलेल्या नदीपात्रावरसिमेंट बांधाचे काम सुरूू असूनहे काम रामभरोसेअसल्याचे दिसून येत आहे हे सर्व काम मजुरांच्या भरोशावर होत असून मजुरांना हे काम कोणाचे माहित नाही मात्र संबंधित ठेकेदार आपल्या व इंजिनियर मजुरांच्या भरोशावर काम करतात या कामावरती फिरवूनही पाहत नाहीत सदरील काम हे इस्टिमेट नुसार होत नसून हे काम किती रुपयाच आहे याची कुठलीस माहिती फलक लावण्यात आलेला नाही तर येथे इस्टिमेट सुद्धा उपलब्ध नाही लाखो रुपयाचे असलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून सदरील कामावरती पाणीसुद्धा मारण्यात आलेले नाही ज्या ठिकाणी काम केले गेले त्या ठिकाणी परवानगी न घेता कित्येक सागवान झाडी पोकलँड च्या साह्याने तोडण्यात आली याची माहिती अजिंठा परिक्षेत्र विभागातील वन परिमंडळाला देण्यात आली परंतु त्यांनीही कुठलीच कारवाई आजवर हाती घेतलि नाही सावळद बारा हे गाव सोयगाव तालुक्यातील शेवटची गाव असून आणि डोंगर रांगेत असून मोठ्या प्रमाणावर नदी नाले झरणे असून येथे सिमेंट बांध अधिक प्रमाणात शासनाकडून राबवले जातात मात्र इंजिनीयरच्या व यांच्यावर अधिकाऱ्यांच्या मिली भगत मुळे हे सर्व कामे थातूरमातूर पद्धतीने करून आपले खिसे गरम करण्याचे काम हे लोक करतात या कामावरती निकृष्ट दर्जाची सिमेंट रेती वापरण्यात आली लोखंडाचे बिल काढले जाते मात्र यात असारी वापरले गेले नाही शासनाच्या बऱ्याच योजना गावोगावी येतात पण कागदोपत्री घोडे नाचवून कामाचे बिल काढण्यात येते या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गोकुळसिंग राजपूत,विजय काळे तालुका अध्यक्ष सोयगाव व गावकऱ्याकडून व्यक्त होत आहे
Users Today : 20