मंठा तालुक्यात रात्रंदिवस वाळू उपसा !

Khozmaster
2 Min Read
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा तालुक्यातील तळणी परिसरात पूर्णा नदीपात्रातून टाकळखोपा, सासखेडा, वझर सरकटे या ठिकाणाहून अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतुकीला संध्या ऊत आला आहे. या ठिकाणावरून रात्रंदिवस वाळू उपसा होत आहे. सुरुवातीला वाळू तस्कराकडून रात्री स खेळ चालत होता. परंतु आता दिवस-रात्र अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतुकीचा सपाटा तस्करांनी चालवला आहे. सर्वसामान्यांना शासकीय दरामध्ये रीती मिळत नसून डेपो धारक वाळू तस्करांना हाताशी धरून चढ्या दराने रेती विक्री करत आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी
रुपयांचा महसूल बुडत आहे.
मंठा तालुक्यातील महत्त्वाच्या अशा १० ते १२ ठिकाणांचा वाळू घाट लिलाव नवीन धोरणामुळे रद्द झाले. त्यामुळे वाळू मिळणे जिकरीचे झाले. याचा फायदा अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी घेतला आहे. रात्रभर नदीपात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. या वाळू चोरट्यां धुमाकूळ सुरूच आहे.
पोलिसांकडून कारवाई सुरू असली तरी याला वाळूमाफिया जुमानत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नदीपात्राचे अक्षरशः चाळणी झाली असून शासनाचा देखील कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. संबंधित रेतीमाफियांचे मोबाईल व संबंधित महसू कर्मचाऱ्यांचे व तहलाटी यांचे मोबाईलचे जप्त करून मोबाईल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अवैध वाळूचा
उपसा करून टिप्पर व ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक केली जात आहे. महसूल विभागाकडून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पथके नेमली आहेत पण हे पथके पैसे घेऊन गायब होतात. मात्र, वाळू माफियांची दादागिरी वाढली असून, पथकांसमोर टिप्पर व ट्रॅक्टर पळवून नेत आहेत. कधी कधी जप्त केलेले वाहन सुद्धा शासकीय कार्यालयातून पळवून नेत आहेत. गौण खनिज उत्खननाची लूट सुरू असून, पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. याकडे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त साहेब व जालना जिल्हाधिकारी साहेब यांनी गांभीर्याने लक्ष देण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
0 9 4 7 5 2
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *