सप्तशृंगी माता मंदिर सापडलेच नाही !

Khozmaster
2 Min Read
आधी ‘क ‘दर्जा नंतर मंदिर
पहूर मधील अजब कारभार !
ट्रस्टकडून मंदिर बांधकाम सुरू
फसवेगीरीबद्दल कारवाईकडे लक्ष ?
जामनेर विशेष प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर ( ता . )
जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या जय सप्तशृंगी माता निवासीनी ट्रस्टने  मंदिर बांधकामास आज ( ता . ६ ) सुरुवात केली . खरं तर जय सप्तशृंगी मातेचे  ‘क ‘ वर्ग मंदिर हरविल्याची तक्रार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सह पोलीस अधिक्षक , धर्मादाय उपायुक्त , मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे  २९ एप्रिल २०२४ रोजी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केली आहे .
       रजि. ९८३ क्रमांकाने धर्मादाय कार्यालयात  नोंदणीकृत असलेल्या  जय सप्तशृंगी माता ट्रस्टच्या अध्यक्षांनी राजकीय बळाचा वापर करून नसलेल्या मंदिराला ‘क ‘दर्जा मिळवून घेतला आहे . ग्रामपंचायतीच्या दप्तरी मालमत्ता २ ४३ अध्यक्षांची मालकी असून   ‘आधी क दर्जा आणि नंतर मंदिर ‘ असा अजब कारभार सध्या खुले – आम पहूर गावात सुरू आहे .
     या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले की , आम्ही तक्रारदार शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या अर्जानुसार धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे .
      दरम्यान , जय सप्तशृंगी मातेच्या मंदिर हरविल्या प्रकरणी भाविक सतप्त झाले असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे .
0 9 4 7 9 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *