छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा व टिटवी पळसखेडा व सावळदबारा परिसरात येथे आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या निमित्ताने जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचाराचा झंजावत सुरू असताना अनुसूचित जाती जमाती भाजपा सेलचे जिल्हाध्यक्ष किशोरजी जगताप यांच्याकडून सावळदबारा व परिसरामध्ये प्रचाराचा नारळ फोडला प्रत्येक गावातील वीर हुतात्मे व महात्म्यांना अभिवादन करून प्रचार सभेला सुरुवात झाली.पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये जाऊन जिल्हाध्यक्ष यांनी मागील दहा वर्षांमध्ये मोदी सरकारकडून खास दलित व इतर मागासवर्गीय समाजासाठी कशाप्रकारे रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना इतर आर्थिक विकास महामंडळ यासाठी भरघोस मदत केली याचा विकासाचा पाढाच आज वाचून दाखवला कशाप्रकारे मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून खासदार रावसाहेब दानवे पाटील यांच्यामार्फत तळागाळापर्यंतच्या जनसामान्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या व आजही हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व विकासाच्या दृष्टीनेच निर्णय घेते याचे असंख्य उदाहरण आपण त्यांच्या योजनेच्या माध्यमातून बघू शकतो कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करणारे हे सरकार सर्वसामान्यांना आज जगाच्या पाठीवर एक भारतीय म्हणून गर्वाने मान उभी राहते आहे ते केवळ फक्त या मोदी सरकार मुळेच दीक्षाभूमी चैत्यभूमी त्याचबरोबर इंग्लंडमधील शिक्षाभूमी ते इंदू मिल मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विशाल असे स्मारक या सरकारने उभे केले त्यामुळे सर्वसामान्यांच्या भावनांचे विचार करणारे सरकार आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष किशोर जगताप यांनी केले पिंपळवाडी मालबद्ध मोलखेडा हिवरी घाणेगाव मूर्ती नादातांडा दाभा टिटवी पळसखेडा सावळदबारा देवारी या संपूर्ण गावांमध्ये प्रत्येक ताड्या वस्त्यावरती जाऊन जिल्हाध्यक्ष व त्यांच्या सर्व टीमने खासदार रावसाहेब दानवे पाटील यांचा प्रचार केला त्यांनी केलेल्या सर्व विकासाच्या कामाचा जनसामान्यापर्यंत पोहोचविल्या 35 वर्षांमध्ये या पंचक्रोशीतील सर्वात महत्त्वाचे प्रश्न रस्ता वीज व पाणी जर कोणी दिली असेल तर ते केवळ रावसाहेब पाटील दानवे यांनी दिले अशी चर्चा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारांमध्ये आज प्रत्येक सभेच्या ठिकाणी चर्चा ला येत होती हीच दादाच्या कामाचे श्रेय आहे असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष शांताराम खराटे यांनी बोलून दाखवली यावेळेस परिसरातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने माझी सभापती शिवाप्पा चोपडे vjnt सेल प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण भाजपा तालुका अध्यक्ष गणेश लोखंडे सरपंच उत्तम चव्हाण बोराडे सर, जि प सदस्य खरात साहेब मुकुंद सुरडकर, शाखा विभाग प्रमुख पंढरी साबळे, बुद्ध प्रमुख रामचंद्र चिमणकर, प्रभू सुरडकर , गणेश खैरे, राहुल हेंलोडे, प्रभाकर बंडे, मोरसीग चव्हाण विष्णू चव्हाण, त्र्यंबक शिंगारे, माजी उपसरपंच मुकुंदा मानकर अनिल राठोड, अज्ञात सिंग राठोड, ताराचंद राठोड, नाम मा सभापती सांडू तडवी मा.सभापती धरमसिंग चव्हाण, अनिल सुरडकर, भाजपा पदवीधर प्रकोष्ट भाऊराव कोलते, दीपक मानकर ईश्वर भुसारी विनोदी टीकारे ज्ञानदेव खडके, एकनाथ वरखड, राजू दांडगे, काशिनाथ कुरंकार परिसरातील सर्व पत्रकार तसेच भाजपा शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी व मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते अशी माहिती शांताराम खराटे यांनी दिली
Users Today : 21