पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स ॲकडमीच्या खेळाडूंनी कलर बेल्ट परीक्षेत केले उज्ज्वल यश संपादन

Khozmaster
3 Min Read
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर , (ता . ६) : विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे देणाऱ्या पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स  अकॅडमीच्या खेळाडूंनी तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत उज्वल यश संपादित केले .  आज ( ता .६ )  जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे  यांच्या प्रमुख उपस्थितीत तायक्वांदो  बेल्ट प्रात्यक्षिक  परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . या तायक्वांडो कलर बेल्ट परिक्षेत ३४ खेळाडूंनी यशस्वीपणे तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत यश संपादन केले .
आज स्पर्धेच्या युगात मुला – मुलींसाठी  स्वसंरक्षण काळाची गरज बनली आहे . मुला -मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे शौर्य ॲकडमीत दिले जात असून मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील खेळाडू लाभ घेत आहेत . १० वी बोर्ड परीक्षेत खेळाडूंचे गुण ग्राह्य धरले जात असल्याने विद्यार्थ्यांना फायदा होतो . सैन्य भरती , पोलीस भरती तसेचशासकिय नोकरीतही खेळाडूंना विशेष सवलत मिळते त्यामुळे या खेळांकडे विद्यार्थी – पालकांनी सजगपणे पाहावे असे आवाहन अजित घारगे यांनी केले .
या यशा बद्दल खेळाडूंना महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबूराव आण्णा घोंगडे  जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे सचिव तथा प्रशिक्षक हरीभाऊ राऊत , ईश्वर क्षिरसागर , भूषण मगरे, दानिश तडवी यांच्या हस्ते  प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले
असे आहेत गुणवंत विद्यार्थी
*येलो कलर बेल्ट*
प्रांजली धनगर , माहेश्वरी धनगर
दिव्या वानखेडे , तेजस्विनी दातार ,
अंकिता उबाळे , दिशा धनसिंग
स्वरा पाटील , जिज्ञेस सोनवणे
प्रथमेश चौधरी
*ग्रीन कलर बेल्ट*
स्वरा जाधव , तन्हवी जाधव
पल्लवी गायकवाड ,दुर्गेश साखरे
भावेश महाजन ,समर्थ जाधव, प्रकाश कुमावत
*ग्रीन -1 कलर बेल्ट*
हर्षदा उबाळे ,आरुषी कुमावत ,
अभिमन्यू घोंगडे ,प्रेम साखरे
भावेश निकम ,निलेश मालकर
*ब्लू कलर बेल्ट*
मोहिनी राऊत ,जयश्री घोंगडे
जागृती चौधरी , स्वाती चौधरी ,
इशांत चौधरी ,सतिष क्षिरसागर
*ब्लू – 1 कलर बेल्ट*
गौरी कुमावत , हरीश घाटे  ,
दिनेश राऊत ‘यश राऊत  ,
हर्षल उदमले , वेदांत क्षिरसागर
         *या यशा बद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे उपाध्यक्ष बाबूराव आण्णा घोंगडे , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे  संचालक ॲड संजय पाटील , शंकर भामेरे , प्रकाश जोशी , किरण जाधव श्रीमती कल्पना बनकर यांनी अभिनंदन केले* .
            सर्व खेळाडूंना शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे सचिव तथा  प्रशिक्षक हरीभाऊ राऊत, ईश्वर क्षिरसागर, भूषण मगरे यांचे मार्गदर्शन लाभले
*सर्व  गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*
0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *