वैजापूर: कीर्तनाचा कालाआनंद, उत्साह,व एकीचे अध्यात्मिक प्रतीक होय; हभप विकास महाराज गायकवाड

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०६
काल्याच्या किर्तनाने केलेल्या पारायण कार्याला पूर्णत्व
प्राप्त होते,व पारायण करणाऱ्या भक्त-भाविकांच्या जीवनातील दुःख, समस्या,असमाधान लोप पावते असे अमृत वचन साईकथाकार हभप विकास महाराज गायकवाड यांनी वैजापूर येथील श्री साई भक्त बहू उद्धेशिय सेवा भावी संस्था च्या श्री साई सच्चरीत्र पारायण सांगता समारोहात सोमवार(ता,०६)रोजी महादेव मंदिर येथे  केले, ते पुढे म्हणाले की,”काला म्हणजे भिन्न-भिन्न पदार्थापासून  भगवंताच्या नावाने बनविलेला महाप्रसाद होय,आणि हा काला एकत्र बसून ग्रहण करणे म्हणजे ऐक्य,आनंद,उत्साह,समाधान व अध्यात्म एकीचे आदर्श प्रतीक होय,”असे ही महाराज पुढे म्हणाले,या प्रसंगी साईबाबा प्रतिमेची मिरवणूक तप्त उन्हामुळे शिर्डीस न जाता वैद्यनाथ मंदिराला पांच प्रदक्षिणा मारून पूर्ण  करून करण्यात आली, ग्रंथ वाचक ज्ञानेश्वर माऊली गायकवाड व शरद महाराज राजगुरू यांचा यथोचित सत्कार करण्यात आला,या प्रसंगी महेंद्र काटकर,राम  उचित,मनोज गायकवाड, श्याम उचित,प्रशांत गायकवाड,अनंत अधिकार,कचरू राजपूत, मेउल पोकरणे,सुधीर लालसरे,विलास रामैय्या,ऋतिक राजपूत,उमेश राजपूत,भरत  उचित,अमोल उशीर,कुणाल चव्हाण,पिंकेश आसर यांनी सहभाग नोंदविला, सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले आभार, शैलेश पोंदे यांनी मानले, या प्रसंगी उमेश शेठ वाळेकर,प्रविणा वाळेकर,योगिता साखरे,मोना पैठणे,संतोषी लालसरे,यांनी सहभाग नोंदविला,महादेव मंदिर विश्वस्त
च्या वतीने अध्यक्ष सिद्धेश्वर साखरे,सुशील आसर,जितेंद्र पवार यांनी हभप गायकवाड महाराज यांचें पूजन  केले,नंदू हरिदास यांनी महादेव मंदिर ट्रस्ट
ला ३१हजार रुपये देणगी त्यांच्या मातोश्री स्व.शांताबाई मधुकर हरिदास यांच्या स्मृती प्रित्यर्थ
दिल्या बद्धल नंदू यांचा सत्कार करण्यात आला,उत्सव समिती अध्यक्ष विशाल शेठ संचेती व संस्थापक अध्यक्ष कैलास साखरे,व कार्याध्यक्ष राजेंद्र लालसरे यांच्या मार्गदर्शन खाली ह्या १५व्या वर्षाचे साई सच्चरित्र पारायण व शिवमहापुराण कथा सम्पन्न झाल्या,
0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *