अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित वैजापूर केंद्रात लोटली भक्ताची अलोटगर्दी—

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०६
येथील स्वामी समर्थ केंद्रात गेल्या सात दिवसापासून श्री गुरू चरित्र पारायण,श्री वल्लभ चरित्र पारायण,श्री नवनाथ पारायण,श्री दुर्गा सप्तमी पारायण, श्री मल्हारी
सप्त शक्ती पारायण ,श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण,तसेच दररोज विविध याग,यज्ञ असे कार्यक्रम
श्री,स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आले होते, या सर्व कार्यक्रमाचा सांगता समारंभ अक्कलकोट  निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी दिनी सोमवार( ता,०६)रोजी केंद्रात महाआरती व महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने सम्पन्न झाला,या प्रसंगी केंद्रात हजार  महिला भक्त व  पाचशे वर पुरुष भक्त उपस्थित होते,पारायणं साठी ही पाचशे महिला व तीनशे पुरुष भक्त यांची उपस्थिती होती,श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती झाल्यावर महाराज नावाचा जय,जय,कार करण्यात येऊन उपस्थित सर्व भक्त भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले,या केंद्राचे संस्थापक अध्यक्ष स्व,आर,एम,वाणी यांच्या काळापासून महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम केंद्रात घेण्यात येतात,मुलांवर सुसंस्कार या माध्यमातून होतात, सर्व भक्तगण सुमार्ग स्वीकारतात,या केंद्रातून विधायक व रचनात्मक विचारांची पेरणी होते, शहरातील हे महत्वाचे  सुसंस्कार व मूल्य जपवणुकीचे केंद्र आहे,
या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक लिमेश वाणी, या केंद्राची सुव्यवस्था पाहणारे सुरेश आलूले,श्रीमती सुमनबाई आलूले व यांना नेहमी सहकार्य करणारे सेवेकरी सी,के,पवार,अरविंद तुपे,शिल्पा तुपे,सोनाली त्रिभुवन,प्रतीक्षा मोकळं,सौ,अनिता राजपूत, श्रेयस चव्हाण, उत्कर्ष अनर्थे, दत्ता रोजेकर ,वाल्मिक आदमाने,सचिन बढे,सचिन राजपूत,ऋतिक राजपूत,रणजित राजपूत,व धोंडीराम ध राजपूत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *