तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
देऊळगांव राजा
शहराची 350 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला शंकर प्रासादिक तुरेवाले मंडळ यांचा पलभटी देवी उत्सव रात्रभर रंगला . दिनांक ६ मे रोजी रात्री ४ वाजता.ग्रामदैवत श्री बालाजी मंदिरासमोर कागदी दैत्याच्या मुखवटाचे देवीने वध केले . यावेळेस हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती .
दिनांक सहा मे रोजी रात्री बारा वाजता जुना जालना रोडवरील विठ्ठल मंदिर येथे शंकर प्रासादिक पुरवाले मंडळ यांचे पलभटी देवीचे सॉंग बाहेर निघाले . येथील चतुर्श्रृगी देवी मंदिर येथे दर्शन घेऊन आरती झाली . त्यानंतर देवीची मिरवणूक पारंपारिक वहिवाटे वरून निघाली . जागोजागी घरासमोर महिलांनी देवीचे औक्षण करून ओटी भरली . ग्रामदैव श्री बालाजी मंदिरासमोर रात्री तीन वाजता देवीचे आगमन झाले . यावेळेस हजारो भाविक भक्त यांची मंदिरासमोर एकच गर्दी झाली होती . मंदिरासमोर कागदी दैत्य देवीला दाखवण्यात आले . या दैत्याचा वध रात्री चार वाजता देवीने केला . हिंगलेश माता की जय च्या गजरात बालाजी फरस दुमदुमून गेले . मंदिराला प्रदक्षिणा केल्यानंतर पारंपारिक वहिवाटे वरून जुना जालना रोड येथील विठ्ठल मंदिर येथे सकाळी देवीचे सोंग पोहोचले . येथे आरती करण्यात आली . व देवीचे सोंग उतरवण्यात आले . महाप्रसादाने या देवीची उत्सवाची सांगता झाली .
या उत्सवाचे आयोजन शंकर प्रसादिक तुरेवाले मंडळ हे करतात . 350 वर्षापासून ही परंपरा आजही जोपासली जात आहे .
Users Today : 39