बस्तरवाडीवाल्यांनो, पाणी भरुन ठेवलं का? १२ तासांचा शटडाऊन, ‘या’ भागांचा पाणीपुरवठा खंडित

Khozmaster
1 Min Read

नागपूर : महापालिका आणि ओसीडब्लूच्यावतीने खैरीपुरा पुलाजवळील ६०० मीटर व्यासाच्या वाहिनीचे काम हाती घेण्यात आल्याने बस्तरवाडी भागातील जलकुंभावर १२ तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. हा शटडाऊन आज बुधवार, ८ मे रोजी रात्री ९.३० वाजेपासून गुरुवार, ९ मे रोजी सकाळी ९.३० वाजतापर्यंत राहील. या कालावधीत अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. या काळात नागरिकांना टँकरनेही पाणीपुरवठा होणार नसल्याचे ओसीडब्लूने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक महापालिका-ओसीडब्लूच्या हेल्पलाइन क्रमांक १८०० २६६ ९८९९ वर संपर्क साधू शकतात.

पाणी पुरवठा बाधित भाग

स्तरवाडी-१ए : नयापुरा, लोधीपुरा, गोंधपुरा, श्रीराम सोसायटी, पौनीकर सायकल स्टोअर्स, नागा शिव मंदिर, माता मंदिर, रामदेव आखाडा, श्रीवास्तव विहीर, बाहुली विहीर, देवघरपुरा, पंगीपुरा, पहाडपुरा, लालगंज, इटवा पोस्ट ऑफिस, पाचडेवाल मंदिर, बस्तरवाडी माता मंदिर, विठू महाजन घर, गोधेवाली गल्ली, तेलघाणी, कुंभारपुरा, संगवार विहीर, राऊत चौक, तेलीपुरा, पेवठा.

बस्तरवाडी-१बी : चकना चौक, मराठा चौक, गुप्ता चौक, छत्तीसगडी राम मंदिर, नाईक तलाव, बांग्लादेश पोलिस चौकी, बैरागीपुरा, तांडापेठ नवीन बस्ती, मोचीपुरा, रामनगर, बरईपुरा, संभाजी कासार, बंगालीपंजा, मुसलमानपुरा, विणकर कॉलनी, ठक्कर ग्राम, खाटीकपुरा, लाडपुरा, कुंभारपुरा.

बस्तरवाडी-दोन जलकुंभ : कुंदनलाल गुप्तानगर, बोहरा कब्रिस्तान, कोलबास्वामीनगर, तिनखडे ले-आउट, वृंदावननगर, मेहेंदीबाग कॉलनी, बिनाकी मंगळवारी, जोशीपुरा, मेहेंदीबाग कॉलनी, गोसावी घाट, डोरले हाऊस, निमजे आटा चक्की, जोशीपुरा, पोळा मैदान, बिनाकी मंगळवारी, भोळेनगर, आनंदनगर, बिनाकी ले-आउट, नामदेवनगर, अनसुया मातानगर.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *