कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. वाळवा तालुक्यातील साखराळे येथील एका मतदान केंद्रावर बोगस प्रतिनिधी बसवल्याच्या कारणातून खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. यावेळी बंद असलेली मतदान प्रक्रिया सुरू करा, असे म्हणत शाब्दिक चकमक झाली. यानंतर वाद वाढल्याने कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. मात्र, काहीकाळ याठिकाणी मतदान प्रक्रिया थांबवली गेली होती, ती पुन्हा पूर्ववत सुरू झाली.
हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गट, शिवसेना ऊबाठा गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट लढत होत आहे. वाळवा तालुक्यातील साखराळे येथील ६२ व ६३ नंबरच्या मतदान केंद्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे बोगस प्रतिनिधी बसले असल्याचा धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यानी आरोप करत काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवत बोगस प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली.
Users Today : 1