लातूर: नाना पटोले यांचे भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले संबंध उघड झाले आहेत. काँग्रेस पक्षानं त्याबाबत निर्णय घेतला तर अधिक चांगलं आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंबाबत मत व्यक्त केले आहे. प्रकाश आंबेडकर हे नेहमीच काँग्रेसच्या धोरणांवर शाब्दिक वार करत असतात. यात विशेषत: ते नाना पटोलेंना लक्ष्य करतात.प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये येणार होते, मात्र त्यांच्या मनात काय चाललं आहे हे लक्षात येत नाही असं मत नाना पटोले यांनी काल व्यक्त केलं होतं. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले आणि भाजपाचे संबंध सांगत पटोलेंना एकप्रकारे टोलाच लगावला आहे.
आंबेडकर पुढे म्हणाले की, ‘काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला फोन करुन सांगितले की, लातूरचे काँग्रेसचे उमेदवार बरोबर नाहीत.आम्ही प्रचार करायचाय म्हणून करतोय. हीच परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. यावरुनच मी म्हणालो की, काँग्रेस तयार असेल तर एकत्र आपण विधानसभा लढवू शकतो.’
Users Today : 28