नवी मुंबई : नवी मुंबई हत्येच्या घटनेने हादरलं आहे. ६० वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. नवी मुंबई परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नी नवी मुंबई शहरात वास्तव्यास होती, मात्र आरोपी हा गावी आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी येऊन – जाऊन राहत होता. मात्र पत्नी कायमस्वरूपी नवी मुंबईमध्ये वास्तव्यास असल्याने पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, त्यातून दोघांची भांडण झाली आणि त्या रागात पतीने पत्नीला घरातच वार करून तिची हत्या केली. आयुष्यभरासाठी निवडलेला जोडीदार हाच वैरी बनला आणि मृत्यू काळ बनून आला.चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दारावे गावात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर मारेकरी पती पश्चिम बंगालला पळून जाण्याचा बेत आखत होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारावे गावात शनिवारी रात्री महिलेचा खून झाल्याची घटना घडली. दारावे गावातील लालबानू सरदार (वय ४५) यांचा मृतदेह घरात आढळून आला.
मुलगा घराबाहेर गेला होता. त्यावेळी लालबानू सरदार या घरात एकट्याच होत्या. त्यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाले. पतीने चारित्र्यावर पत्नीवर संशय घेतल्याने दोघांमध्ये भाडण झालं. रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तपासात लालबानू यांची डोक्यात जड वस्तूने प्रहार करुन हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.