सोयगाव तालुक्यात वीर महाराणा प्रताप यांची मोठ्या उत्साहात साजरी करा ;गोकुळसिंग राजपूत यांचे आवाहन

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात देशभरात आज वीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या थाटामाटात आनंदात साजरी करा असे आवाहन दैनिक माझा मराठवाड्याचे विभागीय संपादक गोकुळसिंग राजपूत यांनी केले आहे.गावा गावात प्रत्येक ग्रामपंचायतीने वीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात यावी.आपली वीरता हुशारी धाडसाचा साठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानावर कोरले गेले आहे तर प्रत्येक वर्षी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जात असून आज दि .९ मे २०२४ वी त्यांची 485 वी जयंती आहे ती मोठ्या आनंदात साजरी करा.
त्याची विधीवत पूजा करण्यात यावी
विर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त गावा गावात मिरवणूक निघेल तर महिलांनी आप आपल्या घरासमोर सडासारवण करून रांगोळी काढण्यात यावी. वीर महाराणा प्रताप हे एक वीर राजपूत योद्धा व उत्तम युद्ध राज नीती कार होते प्रत्येक तरुणाने यांचा आदर्श घेतला पाहिजे ही काळाची गरज आहे असेही आवाहन विभागीय संपादक गोकुळसिंग राजपूत यांनी केले आहे.मिरवणूकीत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय जय श्रीराम या घोषणा देण्यात याव्यात असे आवाहन संपादक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय सरचिटणीस गोकुळसिंग राजपूत यांनी केले आहे.
0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *