सोयगाव : देशातील महागाई, बेरोजगारी रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या केंद्रातील सरकारला सत्तेतून खाली खेचा – नानाभाऊ पटोले

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव
देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव बेरोजगारांना रोजगार देण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकरी विरोधी केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महविकास आघाडीला बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी जामठी (ता.सोयगाव) येथे सोमवारी (दी.६)  बंजारा मेळाव्यात केले.
यावेळी व्यासपीठावर  सभेत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ,अल्पसंख्याक विभाग प्रदेश अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा,प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद शेख , आमदार राजेश राठोड, माजी आमदार  नामदेवराव पवार, शिवसेना तालुका प्रमुख दिलीप मचे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष इंद्रसिह सोळंके,काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र काळे, माजी जी. प सदस्य लखुसिंग नाईक व राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रवींद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अल्पसंख्याक विभाग प्रदेश अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा,प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद शेख , आमदार राजेश राठोड, माजी आमदार  नामदेवराव पवार, आदींनी बंजारा समाजाला मार्गदर्शन करून कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना बंजारा समाजाच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले.
मेळाव्यास सावळदबारा परिसरातील बारा खेड्यातील हजोरो गोर बंजारा समाजाची उपस्थिती होते असल्याची माहिती राष्ट्रवादी सोयगाव शहर अध्यक्ष रवी काळे यांनी बोलताना दिली..
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *